IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या सिरीजपूर्वी टीमच्या एका खेळाडूला दुखापत झालीये.
IND vs AUS
IND vs AUSsaam tv
Published On

22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलीये. या सिरीजमधील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या सिरीजपूर्वी टीमच्या एका खेळाडूला दुखापत झालीये.

टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत

गुरुवारी भारताच्या प्रॅक्टिस सेशनवेळी फलंदाजी करताना भारताचा मिडल ऑर्डर फलंदाज सर्फराज खानला दुखापत झालीये. सरफराजच्या कोपराला ही दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. परंतु यावेळी त्याला एमआरआयची आवश्यकता नव्हती. 'फॉक्स क्रिकेट'ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईचा सरफराज नेटमधून बाहेर पडत असून त्याने त्याचा उजवा हात धरला होता.

IND vs AUS
IND vs AUS: खरंच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात 4-1 ने हरवणं शक्य आहे का? BGT मध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

सरफराजची दुखापत किती गंभीर?

मिळालेल्या माहितीनुसार, दुखापत गंभीर नसून फलंदाजाला एमआरआय करण्याची गरज नसल्याची माहिती मिळाली. यावेळी पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता असल्याने पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्टमध्ये सरफराज खेळू शकतो. जर रोहित सिरीजमधील पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल तर लोकेश राहुलला यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंगची संधी देण्यात येईल. यावेळी मिडल ऑर्डरमध्ये सरफराज खान खेळू शकतो.

IND vs AUS
IND vs AUS: मिशन BGT साठी टीम इंडियाने कंबर कसली! सिक्रेट सरावाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

सरफराजसाठी ही सिरीज आव्हान

सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावेळी उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय टीममध्ये स्थान मिळवलं. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या सिरीजमध्येही त्याने पहिलं टेस्ट शतक झळकावलं. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही सिरीज सरफराजसाठी आव्हान असू शकते.

IND vs AUS
Ranji Trophy: RCB च्या फलंदाजाने रणजी ट्रॉफीत घातला राडा! 38 चेंडूत चोपल्या 178 धावा अन्...

फेब्रुवारी महिन्यात सरफराजने टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. यावेळी सहा सामन्यांत 37.10 च्या सरासरीने 371 रन्स केलेत. बंगळुरूमधील शतकाव्यतिरिक्त सरफराजला न्यूझीलंडविरुद्धच्या इतर पाच डावांमध्ये संघर्ष करावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com