rinku singh 5 sixes to match winner for royal challengers bengaluru know who is yash dayal amd2000 saam tv news
क्रीडा

RCB vs CSK: रिंकूने ५ षटकार मारले, गुजरातने संघाबाहेर केलं; तोच ठरला RCB च्या विजयाचा शिल्पकार

Who Is Yash Dayal: रिंकू सिंगने ५ षटकार मारलेला यश दयाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे.

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जचा दणक्यात पराभव केला आहे. या पराभवासह चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या संघाशी होणार आहे.

यश दयाल ठरला विजयाचा हिरो

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २१८ धावा केल्या. चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. या सामन्यातील १९ व्या षटकापर्यंत चेन्नईने १८४ धावांपर्यंत मजल मारली होती. शेवटच्या षटकात प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नईला १७ धावा करायच्या होत्या. रविंद्र जडेजा आणि एमएस धोनी दोघेही शानदार फलंदाजी करत होते. त्यामुळे चेन्नईचा विजय निश्चित दिसत होता. मात्र त्याचवेळी यश दयालने निर्णायक षटक टाकलं आणि संघाला विजय मिळवून दिला.

शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एमएस धोनीने स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला. मात्र पुढच्याच चेंडूवर यश दयालने त्याला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. शार्दुलला पहिल्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने १ धाव घेत स्ट्राइक जडेजाला दिली. शेवटच्या दोन्ही चेंडूवर जडेजाला एकही धाव करता आली नाही. हा सामना चेन्नईने २७ धावांनी गमावला.

रिंकूने मारले होते ५ षटकार

यश दयालने आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली आहे. यापूर्वी तो गुजरात टायटन्स संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. या हंगामातील ५ सामन्यांमध्ये त्याला केवळ २ गडी बाद करता आले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रिंकू सिंगने त्याला शेवटच्या षटकात सलग ५ षटकार मारत सामना जिंकून दिला होता. त्यानंतर त्याला गुजरात टायटन्सने रिलीज करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५ कोटी मोजत त्याला आपल्या संघात स्थान दिलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT