ricky ponting  canva
Sports

Ricky Ponting Prediction: हे जरा अतिच झालं..भारत -ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी

Ricky Ponting On Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. दरम्यान या मालिकेबाबत रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS Test Series: भारतीय संघासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण यावर्षी भारताला बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. ही मालिका भारतीय संघाची कसोटीच असते. गेल्या दोन दौऱ्यांवर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. त्यामुळे ही मालिका जिंकून भारतीय संघ हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर होणार आहे त्यानंतर पुढील सामने ॲडीलेड, ब्रिसबेन, मेलबर्न आणि सिडनीमध्ये होणार आहेत.

रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू व्हायला अजूनही ३ महिने आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आतापासूनच अंदाजांचे पुल बांधायला सुरुवात केली आहे. रिकी पाँटिंगच्या मते भारतीय संघाने गेल्या २ मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, मात्र यावेळी ऑस्ट्रेलिया बाजी मारणार. यासह मालिकाही जिंकणार.

ऑस्ट्रेलिया ३-१ ने जिंकणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. पाँटिंगने या मालिकेबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते, ऑस्ट्रेलिया या मालिकेत ३-१ ने विजय मिळवणार. या मालिकेबाबत बोलताना तो म्हणाला की, ' दोन्ही संघांमध्ये रोमांचक मालिका रंगणार. मला तरी हेच वाटतं की, ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळताना काहीतरी करून दाखवावं लागणार आहे.

या मालिकेबाबत बोलताना तो म्हणाला की, ' ५ कसोटी सामन्यांची मालिका पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जी एक आनंदाची बाब आहे. गेल्या काही वर्षांपासून केवळ ४ कसोटी सामने खेळले जात होते. त्यामुळे सर्वच उत्साहित आहे. ड्रॉ सामन्यांची संख्या वाढणार की नाही, माहीत नाही. ऑस्ट्रेलियाच जिंकणार मी असं स्पष्टपणे म्हणणार नाही. कधी सामने ड्रॉ होतील तर कधी हवामानाचा फटका बसेल. त्यामुळे मला वाटतं ऑस्ट्रेलिया ही मालिका ३-१ ने जिंकणार.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT