Ind vs Aus, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये हरमनची जादू चालली! ५२ वर्षांनंतर भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

India vs Australia, Paris Olympics 2024 Hockey News: ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय संघाच्या शानदार कामगिरीची मालिका सुरुच आहे. आता भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
Ind vs Aus, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये हरमनची जादू चालली! ५२ वर्षांनंतर भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
harmanpreet singhtwitter
Published On

भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सुसाट आहे. बेल्झियमविरुद्धचा पराभव सोडला, तर उर्वरीत सर्व सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंकडून शानदार खेळ पाहायला मिळाला आहे. न्यूझीलंड,आयर्लंडला लोळवल्यानंतर भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३-२ ने पराभूत केलं आहे. यासह भारतीय संघाने इतिहास रचला आहे.चट

या सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वीच भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं हे भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं होतं. कारण भारतीय संघाने १९७२ नंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभूत केलं आहे. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन किंवा जर्मनीचा सामना करताना दिसेल.

Ind vs Aus, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये हरमनची जादू चालली! ५२ वर्षांनंतर भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
IND vs SL : रोहित-विराट सज्ज, पहिल्या वनडेवर पावसाचे सावट, पाहा काय सांगतो हवामानाचा अंदाज?

भारतीय संघाची दमदार सुरुवात

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. भारतीय संघाकडून अभिषेकने गोल करत भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिला. हा गोल केल्यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, या संधीचा पुरेपूर फायदा घेत हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला २-० ने आघाडी मिळवून दिली.

Ind vs Aus, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये हरमनची जादू चालली! ५२ वर्षांनंतर भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
IND vs SL : टीम इंडिया खास शतक ठोकणार, श्रीलंकेत चालणार मियां मॅजिक, फलंदाजीत विराटच किंग!

या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंकडून बरोबरीचा खेळ पाहायला मिळाला. सामन्यातील २५ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ऑस्ट्रेलियाकडून क्रेग थॉमने या संधीचा फायदा घेतला आणि ऑस्ट्रेलियाला पहिल गोल करुन दिला. यासह ऑस्ट्रेलियाने १-२ ने कमबॅक केलं. त्यानंतर ३२ व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतने या संधीचा फायदा घेत गोल केला. यासह भारतीय संघाने ३-१ ने आघाडी घेतली. शेवटी ब्लॅक गोव्हर्सने गोल करत ऑस्ट्रेलियाला २-३ ने कमबॅक करुन दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com