नुकतंच टीम इंडियाचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. टी-२० वर्ल्डकपनंतर लगेच या दोघांनी या फॉर्मेटमधून देखील निवृत्ती घेतली होती. आता फक्त हे दोन्ही खेळाडू वनडे फॉर्मेटमध्ये खेळणार आहेत. अशातच आता एका २९ वर्षीय क्रिकेटपटूने आणखी धक्कादायक पद्धतीने निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला आहे.
वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनने वयाच्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने निवृत्तीची घोषणा क्रिकेट जगताला एक मोठा धक्का दिला. निकोलस पूरनने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली आणि याला 'खूप कठीण' निर्णय म्हटले.
निकोलस पूरनने नुकतंच आयपीएल २०२५ संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या व्हाईट-बॉल सिरीजमधून विश्रांती घेण्याचा निर्णयही घेतला होता. यानंतर अवघ्या काही दिवसांनीच निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएल २०२५ मध्ये १४ सामन्यांमध्ये ५२४ रन्स केलेत.
निकोलस पूरनची निवृत्ती वेस्ट इंडिज क्रिकेट टीमसाठी मोठा धक्का आहे. कारण पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली २०२६ चा टी २० वर्ल्डकप आयोजित केला जाणार आहे. दरम्यान निकोलस पूरनने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निकोलस पूरनने वेस्ट इंडिजं नेतृत्वही केलंय.
इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना निकोलस पूरनने म्हटलंय की, 'आपल्याला आवडणाऱ्या या खेळाने मला खूप काही दिलं आहे आणि देत राहील. जसं की, आनंद, उद्देश, अविस्मरणीय आठवणी आणि वेस्ट इंडिजच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी. मरून रंगाची जर्सी घालणं, राष्ट्रगीतासाठी उभं राहणे आणि प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल ठेवताना सर्वकाही देणं... याचा माझ्यासाठी खरोखर काय अर्थ आहे हे शब्दात सांगणं काहीसं कठीण आहे. शिवाय कर्णधार म्हणून टीमचं नेतृत्व करणं हा एक सन्मान आहे.
निकोलस पूरन पुढे म्हणाला की, चाहत्यारांनो... तुम्ही माझ्यावर केलेल्या अटूत प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्ही कठीण काळात मला साथ दिली आणि चांगले क्षण अतुलनीय उत्साहाने साजरे केले. तुमच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने मला अडचणींमधून बाहेर काढले.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.