क्रीडा

Rules For IPL 2025: खेळाडूंचं रिटेंशन, २ वर्षांची बंदी आणि…; आयपीएल २०२५ पूर्वी BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

Surabhi kocharekar

यंदाची आयपीएल म्हणजेच आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी अनेक मोठे बदल होणार आहे. यामध्ये काही बदल हे नियमांमध्ये झाले असून यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलच्या सर्व टीम्सना एक मोठं गिफ्ट दिलं आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची रविवारी बंगळुरूमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये टाटा आयपीएल प्लेअर रेग्युलेशन 2025-2027 वर निर्णय घेण्यात आले. यावेळी ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून हे निर्णय नेमके काय आहेत, पाहूयात

  • आयपीएल फ्रेंचायझी सध्या त्यांच्या टीममधील एकूण ६ खेळाडूंना रिटेन करू शकते. यामध्ये एकतर रिटेन्शनद्वारे किंवा राईट टू मॅच (RTM) पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो

  • रिटेंशन आणि राईट टू मॅचसाठी कॉम्बिनेशन निवडणं आयपीएल फ्रेंचायझींवर आहे. ६ रिटेन्शन्स / राईट टू मॅच मध्ये जास्तीत जास्त ५ कॅप्ड खेळाडू (भारतीय आणि परदेशी) आणि जास्तीत जास्त २ अनकॅप्ड खेळाडू असू शकतात.

  • IPL 2025 साठी फ्रँचायझींसाठी ऑक्शन पर्सची किंमत १२० कोटी ठेवण्यात आलीये. एकूण रकमेच्या कॅपमध्ये आता लिलाव पर्स, वाढीव वेतन आणि सामना शुल्क यांचा समावेश असणार आहे.

  • यावेळी घेण्यात आलेल्या एक मोठा निर्णय म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आलीये. प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला ७.५ लाख प्रति सामना फी मिळणार आहे. खेळाडूच्या कराराव्यतिरिक्त हे पैसे त्यांना मिळणार आहेत.

  • विदेशी खेळाडूंना मेगा ऑक्शनसाठी नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये जर नोंदणी केली नसेल तर तो पुढील वर्षी होणाऱ्या लिलावासाठी अपात्र ठरू शकतो.

  • ऑक्शनमध्ये नोंदणी केल्यानंतर खेळाडूची निवड झाली आणि त्याने सिझन सुरू होण्यापूर्वी माघार घेतली तर त्याला २ सिझन लीगमध्ये भाग घेण्यास आणि खेळाडूंच्या लिलावात नाव नोंदवण्यास बंदी घालण्यात येणार आहे

  • भारतीय खेळाडू मागील पाच वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसेल तर तो कॅप्ड भारतीय खेळाडू अनकॅप्ड होणार आहे. हा नियम केवळ भारतातील खेळाडूंसाठी लागू असणार आहे.

  • २०२५-२०२७ सायकलसाठी इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम राहणार आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: प्रेग्नंसीनंतर दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर, आरोग्याबाबत दिली माहिती...

Marathi News Live Updates : विजेचा शॉक लागून तीन जण ठार तर एक जण जखमी,मृतात 13 वर्षाच्या मुलाचा समावेश

Sambhajinagar Corporation : कर भरणाऱ्यांनाच आता मनपा देणार कंत्राट; महापालिका प्रशासकांचा निर्णय, सादर करावे लागेल एनओसी

Maharashtra Politics : "देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून तावडेंना पुढे आणलं जातंय"

PM Modi Speech: 'विकसित देशाचे केंद्रस्थान पुणे..', पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन; नव्या मेट्रो मार्गिकेचे केलं लोकार्पण

SCROLL FOR NEXT