RCB VS RR IPL 2025 X
Sports

RCB VS RR : चिन्नास्वामी स्टेडियमवर IPL 2025 मधला बंगळुरूचा पहिला विजय! 'रॉयल' लढतीत राजस्थानचा पराभव, पण फटका बसला मुंबईला...

RCB VS RR IPL 2025 : चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध राजस्थान हा सामना रंगला होता. या सामन्यात बंगळुरूचा विजय झाला आहे. आयपीएल २०२५ मध्ये घरच्या स्टेडियमवर आरसीबीने सामना जिंकला आहे.

Yash Shirke

IPL 2025 Latest Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये बंगळुरूने ११ धावांनी राजस्थानवर मात करत शानदार विजय मिळवला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर म्हणजेच घरच्या स्टेडियमवर हा आरसीबीचा हा पहिला विजय आहे. या विजयाने बंगळुरूचा संघ पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी रियान परागकडे सोपवण्यात आली. रियान परागने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या बंगळुरूच्या संघाने २० ओव्हर्समध्ये २०५ धावा करत राजस्थानसमोर तगडे आव्हान ठेवले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली सलामीसाठी आले. २६ धावा करत सॉल्ट परतला. विराट कोहलीने दमदार ७० धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम केले. देवदत्त पड्डिकलने देखील अर्धशतकीय खेळी केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये टीम डेव्हिड आणि जितेश शर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत बंगळुरूचा डाव २०० पार नेला.

२०६ धावांचे आव्हान गाठत असताना यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. २५७ च्या स्ट्राईक रेटने यशस्वी जयस्वालने ४९ धावा केल्या. १६ धावा करुन सूर्यंवशी माघारी परतला. नितीश राणाने २८ धावा, तर रियान परागने २२ धावा केल्या. त्यानंतर शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेलने खेळ पुढे नेला. पण ११ धावांवर जेसलवूडने हेटमायरची विकेट घेतली. जुरेल एका बाजूने राजस्थानकडून लढत देत होता. पण त्याची विकेट पडली आणि राजस्थान रॉयल्सची सामना जिंकण्याची शक्यता देखील संपली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT