rcb vs kkr  saam tv
Sports

RCB VS KKR Match Prediction: चिन्नास्वामीच्या मैदानावर RCB घेणार का पराभवाचा बदला? पाहा मॅच प्रेडिक्शन आणि प्लेइंग 11

RCB VS KKR Playing 11: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

RCB VS KKR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३६ वा सामना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि २ वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. कारण या संघाने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला ७ धावांनी धूळ चारली होती.

तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स सामन्याबद्दल अधिक माहिती (RCB vs KKR Match Details)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स - सामना क्रमांक ३६

सामन्याचे ठिकाण - एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

सामन्याची वेळ - संध्याकाळी ७:३० वाजता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स पिच रिपोर्ट (RCB vs KKR Pitch Report)

एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरत असते. या खेळपट्टीवर २०० पेक्षा अधिक धावसंख्या होत असते आणि या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग देखील केला जाऊ शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करून धावांचा पाठलाग करू शकतो. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स संभावित प्लेइंग 11 (RCB vs KKR Playing 11)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB Playing 11) :

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशक

कोलकाता नाइट रायडर्स (KKR Playing 11):

एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT