virat kohli twitter
Sports

RCB vs GT Match Updates: विराटचं बॅक टू बॅक शतक! निर्णायक सामन्यात RCB ने उभारला धावांचा डोंगर; प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

RCB vs GT Live Score: साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे

Ankush Dhavre

IPL Live Score: आयपीएल २०२३ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेला हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर १९७ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९८ धावांची गरज आहे.

विराटचे विराट शतक..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६८ धावा जोडल्या. फाफ डू प्लेसिस २८ धावा करत माघारी परतला. तर विराट कोहलीने ६० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने या खेळी दरम्यान १३ चौकार आणि १ षटकार मारले. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशक

गुजरात टायटन्स:

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT