MI vs SRH IPL Match: विवरांत-मयांकने धू धू धुतलं; 'करो या मरो' सामन्यात हैदराबादचं मुंबईसमोर २०१ धावांचं आव्हान

MI vs SRH IPL Match: प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादने मुंबईसमोर २०१ धावांचे आव्हान दिलं आहे.
MI vs SRH IPL Match
MI vs SRH IPL MatchSaam tv

MI vs SRH News: आयपीएलचा यंदाच्या सिझनचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद सनराइजर्स दरम्यान सामना झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादने मुंबईसमोर २०१ धावांचे आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या हैदराबादच्या विवरांत आणि मयांकने चांगली सुरुवात केली. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये विवरांतने २७ धावा तर मयांकने २१ धावा कुटल्या. पियुष शर्माने सहाव्या षटकासाठी १० धावा दिल्या.

विवरांतने या सामन्यातील १० व्या षटकात पहिलं अर्धशतक ठोकलं. विवरांतने ३० चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. हैदराबादने ११ व्या षटकात १०० धावा पूर्ण केल्या. तर मयांकने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

१४ व्या षटकात हैदराबादला पहिला धक्का बसला. विवरांत झेलबाद होऊन माघारी परतला. विवरांतने मयांकसोबत १४० धावांची भागिदारी रचली.

विवरांत बाद झाल्यानंतर मयांक देखील बाद झाला. मयांकने त्याच्या डावात ८ चौकार आणि ४ षटकार लगावले. आकाशने १७ व्या षटकातील चौथ्या चेंडूत मयांक बाद झाला.

MI vs SRH IPL Match
IPL 2023 Playoff Scenario: RCB vs GT सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण करणार Playoff मध्ये प्रवेश?

मयांक बाद झाल्यानंतर हैदराबादच्या संघावर दबाव निर्माण झाला. मुंबईने १७, १८ व्या षटकात केवळ १२ धावा दिल्या. या दोन षटकात मुंबईने २ गडी बाद केले. आकाश माधवालने शेवटच्या षटकात २ गडी बाद केले. क्सासेन आणि ब्रूक दोघेही शून्यावर बाद झाले. मात्र, विवरांत आणि मयांकच्या खेळीच्या जीवावर हैदराबादने २०० धावा कुटल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com