RCB VS DC Highlights x
Sports

RCB VS DC Highlights : फिल सॉल्टची विकेट पडली अन् मॅच फिरली, दिल्लीच्या गोलंदाजांसमोर आरसीबीने नांगीच टाकली

RCB VS DC IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० ओव्हर्समध्ये १६३ धावा केल्या आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सला जिंकण्यासाठी १६४ धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे.

Yash Shirke

RCB VS DC IPL 2025 Highlights : चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल २०२५ मधला २४ वा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १६३ धावा केल्या. सुरुवातीला सामना आरसीबीच्या हातात होता. पण सॉल्टच्या विकेटनंतर लागोपाठ विकेट पडायला लागल्याने आरसीबीचा धावा करण्याचा वेग मंदावला. दिल्लीने सामन्यातली पकड सुटू दिली नाही आणि बंगळुरूवर दबाव टिकवून ठेवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ही लढत रंगली. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्सच्या खेळाडूंनी २० ओव्हर्समध्ये १६३ धावा केल्या. आता दिल्ली कॅपिटल्ससमोर १६४ धावांचे लक्ष आहे.

फिल सॉल्ट आणि विराट कोहली सलामीसाठी आले. सॉल्ट चांगल्या फॉर्ममध्ये होता. अक्षर पटेलच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये धाव घेताना गोंधळ झाल्याने तो रनआउट झाला. त्याने १७ बॉल्समध्ये ३७ धावा केल्या. सॉल्ट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी कोसळली. पडिक्कल १ धाव करुन परतला. विराट २२ धावा, रजत पाटीदार २५ धावा करुन माघारी परतले. कृणाल पंड्या १८ धावांवर कॅचआउट झाला. टीम डेव्हिडने शेवटच्या ओव्हर्समध्ये काही फटके मारत धावसंख्या १५० पार नेली.

दुसऱ्या बाजूला दिल्लीने सुरुवातीला सुटलेली पकड पुन्हा घट्ट केली. विपराज निगम, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले. अक्षर पटेल आणि मिचेल स्टार्क यांनी सर्वाधिक धावा दिल्या. तसेच त्यांना विकेट देखील मिळाली नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11 -

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 -

फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT