KL Rahul RCB VS DC Highlights x
Sports

RCB VS DC Highlights : दिल्लीचा गड अभेद्यच! केएल राहुलची दमदार खेळी अन् DC ची विजयी घोडदौड कायम

RCB VS DC IPL 2025 : चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सनी पराभव झाला आहे.

Yash Shirke

RCB VS DC : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना चिन्नास्वामी स्टेडियवर रंगला. या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सनी पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा हा आयपीएल २०२५ मधील चौथा विजय आहे. दिल्ली हा आयपीएलमधला अपराजित संघ आहे. खेळलेल्या एकूण सर्व ४ सामन्यांमध्ये दिल्लीने विजय मिळवला आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवर आज आयपीएल २०२५ मधला २४ वा सामना खेळला गेला. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमनेसामने आले. या सामन्यामध्ये दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचे ठरवले. तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० ओव्हर्समध्ये एकूण १६३ धावा केल्या.

बंगळूरूची चांगली सुरुवात झाली. फिल सॉल्ट आक्रमक आणि विराट कोहली संयमी खेळत होते. सॉल्ट रनआउट झाल्यानंतर पुढचे फलंदाज पटापट बाद झाले. पाटीदारने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तोही २५ धावा करुन माघारी परतला. शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत ३७ धावा केल्या आणि आरसीबीची डावसंख्या १६० च्या पुढे गेली.

दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर लवकर बाद झाले. अभिषेक पोरेलही धावा करण्यात फेल झाला. अक्षर पटेल आणि केएल राहुलने खेळ पुढे नेला. सुयश शर्माच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल कॅचआउट झाला. केएल राहुलने शेवटपर्यंत टिकून गरजेनुसार खेळ केला. त्याने सर्वाधिक नाबाद ९३ धावा केल्या. त्याला ट्रिस्टन स्टब्सची साथ मिळाली. स्टब्सने नाबाद ३८ धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11 -

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 -

फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT