CSK च्या माजी खेळाडूने गेम केला, त्याच्यामुळेच MS Dhoni पुन्हा कॅप्टन झाला; ऋतुराजचा काटा नेमका कुणी काढला?

Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंह धोनी हा आमचा नवा कर्णधार असल्याची चेन्नई सुपर किंग्सने अधिकृतपणे घोषणा केली आहे. त्यांचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
MS Dhoni Ruturaj Gaikwad CSK
MS Dhoni Ruturaj Gaikwad CSK X
Published On

MS Dhoni CSK IPL 2025 : महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार बनला आहे. आयपीएल २०२५ मध्ये सलग ४ सामने गमावल्यानंतर सीएसकेचा कर्णधार बदलण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आहे. त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर खास पोस्ट करत महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाबाबतची माहिती दिली. ऋतुराज गायकवाड कोपराच्या फ्रॅक्चरमुळे IPL 2025 मधून बाहेर पडला आहे. आता एमएस धोनी सीएसकेचा कर्णधार असणार आहे, असे सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. २०२२ नंतर आता धोनीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

MS Dhoni Ruturaj Gaikwad CSK
Phil Salt : 6, 4, 4, 4, 6, 4... स्टार्कला धू-धू-धुतलं, पण विराटच्या एका चुकीने फिल सॉल्टला माघारी जावं लागलं

एमएस धोनीच्या पुन्हा एकदा कर्णधार बनण्याच्या मागे एका माजी सीएसके खेळाडूचा हात असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हा माजी सीएसके खेळाडू आहे - तुषार देशपांडे! ज्या गोलंदाजामुळे ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आणि महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपद देण्यात आले तो गोलंदाज म्हणजे तुषार देशपांडे..!

धोनीच्या कर्णधारपदाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटच्या माध्यमातून तुषार देशपांडेमुळे गायकवाडला दुखापत झाली आणि धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार झाला असे चाहते म्हणत आहेत.

MS Dhoni Ruturaj Gaikwad CSK
Mumbai Indians रोहितची टीम नाहीये, ती हार्दिकची... अंबाती रायडू आणि संजय बांगर यांच्यात बाचाबाची, Video व्हायरल

३० मार्च राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला. या सामन्यात राजस्थानकडून खेळणाऱ्या तुषार देशपांडेच्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. देशपांडेने फेकलेला बॉल गायकवाडच्या उजव्या हाताच्या कोपरावर जाऊन आदळला होता. त्याने गायकवाड दुखापतग्रस्त झाला.

MS Dhoni Ruturaj Gaikwad CSK
Ambati Rayudu : आनंद पोटात मावेना... धोनी पुन्हा CSK चा कॅप्टन, अंबाती रायडूची खुसखुशीत प्रतिक्रिया; Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com