इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर तिने निवृत्ती घेतली.
सोफी ही न्यूझीलंड संघाची कर्णधार होती.
आरसीबी महिला संघाची महत्त्वाची खेळाडू आहे.
सध्या महिला वर्ल्ड कपची जोरदार चर्चा आहे. महिला भारतीय संघानं सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्याचदरम्यान एका खेळाडूनं निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही खेळाडू आरसीबीचा देखील सदस्य होती. विशेष म्हणजे या निवृत्तीनंतर खेळाडू रडत रडत मैदानाबाहेर आली आहे. त्यामुळे या खेळाडूचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या खेळाडूचे विराट कोहली खेळत असलेल्या आरसीबी संघाशी खास कनेक्शन आहे. ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून सोफी डिव्हाईन आहे. सोफी डिव्हाईन कर्णधार असलेला न्यूझीलंड संघ आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धेतून आधीच बाहेर झालाय. ज न्यूझीलंडचा स्पर्धेतला शेवटचा औपचारीक सामना होता.
हा सामना जिंकून न्यूझीलंडला शेवट गोड करण्याची आणि आपल्या कर्णधाराला गोड निरोप देण्याची संधी होती. पण न्यूझीलंडच्या संघाने ही संधी गमावली. इंग्लंडने 8 विकेटसने त्यांच्यावर विजय मिळवला. त्यामुळे सोफी डिव्हाईनचा शेवट गोड करता आला नाही.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने तिच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकली. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अख्खा संघ ३८.२ षटकांत १६८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने २९.२ ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठून ८ विकेटने हा सामना जिंकला. या सामन्यात अॅमी जोन्सने ८६ धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी केली.
या खेळीच्या बळावर इंग्लंडने सामना जिंकला होता.अॅमीसोबत टॅमी ब्यूमोंट ४० धावांची हेदर नाईटने ३३ धावांची खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर इंग्लंडने सामना जिंकला. या सामन्यात सोफी डिव्हाईनने नाईटचा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा बळी घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सूरूवात खराब झाली होती. न्यूझीलंडकडून जॉर्जिया प्लिमरने ५७ चेंडूमध्ये ४३ धावांची सर्वाधिक खेळी केली होती.
वर्ल्डकपच्या स्पर्धेत सोफी डेव्हाईनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक आणि दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावलं. मात्र शेवटच्या एकदिवसीय सामन्यात संयम आणि उद्देशपूर्ण खेळाची सुरुवात केली, परंतु ती तिचा डाव टिकवू शकली नाही. ३५ चेंडूत २३ धावांवर बाद झाली. अशा प्रकारे डिव्हाईनच्या १५ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीचा शेवट झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.