Rohit Sharma and Virat Kohli celebrate after guiding India to a big win against Australia — legends prove their era isn’t over yet.
Rohit Sharma and Virat Kohli celebrate after guiding India to a big win against Australia — legends prove their era isn’t over yet.

Rohit-Virat: कोण म्हणतं पर्व संपलं! कोहली दोनदा शुन्यावर बाद तरीही कर्णधार गिलपेक्षा महान; पाहा धावांची आकडेवारी

Rohit Sharma-Virat Kohli: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हे सिद्ध केले की त्यांचा युग अजून संपलेला नाहीये. रोहित शर्मा १२१ आणि कोहलीन ७४ धावांची शानदार खेळी केली. या प्रतिष्ठित जोडीने शुभमन गिलला मागे टाकत भारताला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवून दिला.
Published on
Summary
  • रोहित शर्मानं नाबाद १२१ आणि विराट कोहलीनं ७४ धावा केल्या आहेत.

  • चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांच्या पुनरागमनाचं कौतुक केलं.

  • भारतानं ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला.

विराट-कोहलीचं पर्व संपलं, त्यांनी निवृत्ती घ्यायला हवी, असं म्हणणाऱ्यांना आज दोन्ही खेळाडूंनी चपराक मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवशीय मालिकेचा अखेरचा सामना भारतीय संघाने जिंकला. भारतीय संघाची 'रोको' ची हिट जोडीनं धमाकेदार खेळी खेळत मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात रोहितनं नाबाद १२१ धावा तर कोहलीनं ७४ धावा केल्या. विराट कोहली आणि रोहित शर्माने आपल्या खेळीनं पु्हा दाखवून दिलं की ते अजूनही तेथेच आहेत. त्यांचे पर्व संपलं नाहीये.

जे टीकाकार त्यांना निवृत्ती घेण्याचा सल्ला देत होते त्यांना त्यांनी आपल्या खेळीनं चोख उत्तर दिलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेतील दोन सामन्यात विराट कोहली दोनदा स्वस्तात माघारी परतला. त्यावरून त्याला पुन्हा ट्रोल करण्यात आलं. दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यादृष्टीनं भारतीय संघात मोठे बदल करण्यात आलेत. संघव्यवस्थापकांनी रोहितपासून कर्णधारपद काढून घेत शुबमन गिलकडे संघाची जबाबदारी दिली.

Rohit Sharma and Virat Kohli celebrate after guiding India to a big win against Australia — legends prove their era isn’t over yet.
IND vs AUS: 'माहिती नाही आम्ही पुन्हा येणार...' सामना जिंकल्यानंतर रोहितनं दिले निवृत्तीचे संकेत

दुसरीकडे सघात नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आणि विराट आणि रोहितच्या पर्यायांचा शोध घेण्या येऊ लागलाय. त्याचदरम्यान ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला, त्यात रोहित आणि विराटला संधी देण्यात आली. पण या सामान्यांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली तर ते पुढील २०२७ चा वर्ल्डकप खेळणार की नाही हे ठरेल. मात्र ज्या टीकाकार निवृत्ती घेण्याचा सल्ला देत आहेत , त्यांना दोन्ही खेळाडूंनी खेळातून उत्तर दिलं.

पर्व संपलं नाहीये

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका शिखरावर पोहचलाय. एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 'लिमिटेड ओव्हर' क्रिकेटमध्ये कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलाय. त्याने 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर यांचा विश्वविक्रम मोडीत काढलाय. विराट कोहलीच्या आजच्या नाबाद खेळीनं अनेकांना गप्पगार केलंय.

Rohit Sharma and Virat Kohli celebrate after guiding India to a big win against Australia — legends prove their era isn’t over yet.
Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

दरम्यान शुबमन गिलला विराट कोहलीचा पर्याय म्हणून समोर आणलं जात होतं. त्यावर आता प्रश्न उपस्थितीत झालेत. तीन सामन्याच्या मालिकेत कर्णधार गिल हा फक्त ४३ धावा करण्यात यशस्वी झाला तर विराट कोहली सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात कमी धावसंख्येत बाद झाला होता. पण संपूर्ण मालिकेत कर्णधार गिलपेक्षा जास्त एकूण धावसंख्या केलीय.

सचिन तेंडुलकर यांचा विश्वविक्रम मोडीत काढला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील नाबाद ७४ धावांच्या खेळीदरम्यान विराटने लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये १८,४३७ धावा पूर्ण केल्या आहेत. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर १८,४३६ धावांची नोंद आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर कुमार संगकारा आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर रोहित शर्मा, पाचव्या स्थानावर महिला जयवर्धने आणि सहाव्या स्थानावर रिकी पॉन्टिंग आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या खेळीबाबत बोलताना क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले म्हणाले की, त्या दोघांचे पर्व संपलं नाहीये. ते ऑउट ऑफ फॉर्म नाहीत. यातील एकजण हा चॅम्पियन ट्रॉफी फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय तर दुसरा चॅम्पियनशीपच्या सेमी फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय.

विराट आणि रोहित हे एकदिवसीय सामन्यातील दिग्गज खेळाडू आहेत. मागच्या एकदिवशी सामन्यात विराट कोहलीलाल दोन पुरस्कार मिळालेत. त्यातील एक पुरस्कार पाकिस्तान विरुद्धातील सामन्यातील आहे. तर फायनल सामन्यात रोहित शर्मा हा प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता.

रोहित शर्माची कमाल

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धात जबरगदस्त खेळी खेळत असतो. त्याने त्यांच्याविरुद्ध नऊ शतके झळकावली आहेत आणि याबाबतीत महान सचिन तेंडुलकरची बरोबरी केलीय. यात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर ६ शतक केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com