IND vs AUS T20 Series: ODIनंतर आता टी२० चा रंगणार थरार; भारत-ऑस्ट्रेलिया कधी येणार आमनेसामने? जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक
भारत-ऑस्ट्रेलियामधील एकदिवशीय मालिकेनंतर आता टी२० मालिकेचा थरार रंगणार.
भारताने तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात विजय मिळवला.
दोन्ही संघ आता टी२० मालिकेत आमनेसामने येणार आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आता टी२० सामन्यांत आमनेसामने येतील. दोन्ही देशाच्या संघात ५ टी२० सामने होतील. टी२० सामन्यांची मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. एकदिवशीय सामन्यांचा थरार संपल्यानंतर आता सोमांचकारी टी२० सामने खेळले जाणार आहेत. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.
दरम्यान ३ सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेत भारताला दोन सामन्यासह मालिका गमावावी लागली. तर मालिकेतील तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं. तिसऱ्या सामन्यातील दमदार विजयानंतर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाची धडकी भरवली आहे.
टी२० क्रिकेट सामन्यात संघाच्या नेतृत्वाची धुरा सूर्यकुमार यादव यांच्याकडे असणार आहे. तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा संघावर दबाव निर्माण झालाय. दरम्यान ही टी २० मालिका २९ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर अखेरचा सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या मालिकेतील पहिला सामना कॅनबरामधील कनुकाच्या ओव्हलमध्ये खेळला जाईल.
त्यानंतर दुसरा सामना हा ३१ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. त्यानंतर मालिकेतील अखेरचे तीन सामने २,६ आणि ८ नोव्हेंबर रोजी होतील. हे तिन्ही सामने मेलबर्न क्रिकेट मैदानावर होतील. ही टी २० मालिकेतील सामन्यांची सुरुवात दुपारी भारतीय वेळेनुसार १ वाजून ४५ मिनिटांपासून होईल.
भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
पहिला सामना - २९ ऑक्टोबर - कॅनबरा
दुसरा सामना - ३१ ऑक्टोबर मेलबर्न
तिसरा सामना- २ नोव्हेंबर , होबार्ट
चौथा सामना- ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना - ८ नोव्हेंबर, ब्रिस्बेन येथे होईल.
असे असतील दोन्ही संघ
भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसंग , रिंकू सिंह, वाशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलियाचा संघ
मिशेल मार्श (कर्णधार), सीन अबॉट, झेव्हियर बार्टलेट, महली बियर्जमॅन, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिश, मॅथ्यू कुह्रमॅन, ग्लने मॅक्सवेल, मिशेल ओव्हेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिकस , अॅडम झॅम्पा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

