RCB Player X
Sports

Cricket : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, RCB च्या स्टार खेळाडूवर महिलेचे गंभीर आरोप

Yash Dayal : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू यश दयालवर एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने सीएम हेल्पलाइन पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.

Yash Shirke

IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज यश दयाल मोठ्या वादात अडकला आहे. आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यश दयालवर एका महिलेने लैंगिक शोषण करण्याचा आरोप केले आहे. लैंगिक शोषणासह हिंसाचार आणि फसवणूकीचा आरोप देखील यश दयालवर करण्यात आला आहे. पीडितेने सोशल मीडियावर पोस्ट करत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांकडे न्याय मागितला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने सीएम हेल्पलाइन पोर्टलवर तक्रार दाखल केली. तक्रारीचे स्क्रीनशॉट तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. या पोस्टमध्ये तिने यश दयालसोबतचे फोटो देखील शेअर केले. मागील ५ वर्षांपासून मी त्याच्यासोबत (यश दयालसोबत) होते. त्याने कुटुंबाशी ओळख करुन मला विश्वासात घेतले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने माझे भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले, असे महिलेने म्हटले आहे.

फसवणूक होत असल्याचे कळताच पीडित महिलेने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खेळाडूने शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्याने इतर महिलांसोहत देखील असे खोटे संबंध ठेवले होते, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेने आरोप करताना कोणत्याही क्रिकेटपटूचे नाव लिहिले नाही. पण तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये यश दयालसोबतचा फोटो तिने शेअर केला आहे. यश दयालकडून अद्याप या प्रकरणात कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

२१ जून रोजी सीएम हेल्पलाइनवर पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच २५ जून रोजी तिने तक्रारीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. हेल्पलाइनवर या प्रकरणाची तक्रार करुनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे म्हणत पीडित महिलेने पोलिसांवर देखील आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT