Team Indiaच्या नेट प्रॅक्टिसदरम्यान WWE! दोन खेळाडू फिल्डिंग कोचला भिडले, नेमकं काय झालं? पाहा Viral Video

Ind Vs Eng दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सराव सत्रादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Team India
Team IndiaX
Published On

India Vs England यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याची तयारी सुरु झाली आहे. कसोटी मालिकेमध्ये भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै यादरम्यान बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. दुसऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यादरम्यान भारतीय खेळाडूंचा मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Team India
Ind Vs Eng सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, टीम इंडियाच्या कर्णधाराची तब्येत बिघडली

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ टीम इंडियाच्या सरावसत्रामधील आहे. या व्हिडीओमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि आकाश दीप हे टीम इंडियाचे गोलंदाजी विभागाचे प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्यासोबत दंगामस्ती करताना दिसत आहेत. तिघांचा खोडसाळपणा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये तिघेही WWE मधील खेळाडूंची नक्कल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला मॉर्ने मॉर्केल अर्शदीप सिंहसोबत मज्जा करताना दिसत होता. त्यानंतर अर्शदीप सिंहने आकाश दीपसोबत मिळून मॉर्ने मॉर्केलला जमिनीवर फेकले. मॉर्ने मॉर्केल पुढे पुन्हा एकदा अर्शदीप सिंहसोबत भांडताना दिसला. भारतीय खेळाडूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Team India
Gautam Gambhir : तुला हवे, ते खेळाडू दिले... आता अपेक्षित निकाल दे अन्यथा... ! गौतम गंभीरला मिळालीय वॉर्निंग

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना

लीड्सवर भारतीय संघाला पराभवाचा सामना करायला लागला. आता कसोटीत टिकून राहण्यासाठी भारताला एजबॅस्टन कसोटी जिंकणे आवश्यक आहे. पण हा कसोटी सामना जिंकणे भारतासाठी कठीण जाणार आहे. एजबॅस्टनमध्ये भारताचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. या स्टेडियमवर भारताने एकूण ८ सामने खेळले आहे. यातील ७ सामने भारताने गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला.

Team India
Crime : नोकरीचं आमिष दाखवत वारंवार बलात्कार नंतर जबरदस्तीने गर्भपात, साधूबाबावर महिलेचे गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com