Virat Kohli RCB X
Sports

RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी! थेट विराट कोहलीची बॅट चोरली, व्हायरल व्हिडीओमागचे सत्य काय?

Virat Kohli : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना संपल्यानंतर बंगळुरूच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी झाली. चोराने विराट कोहलीच्या किटबॅगमधून त्याची एक बॅट चोरली. ही बॅट कुणी चोरली? जाणून घ्या..

Yash Shirke

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात बंगळुरूचा सहज विजय झाला. आरसीबीने ९ विकेट्स राखून राजस्थानवर मात केली. या सामन्यात बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार खेळी केली. त्याने ४५ बॉल्समध्ये ४ चौकार आणि २ षटकार मारत ६२ धावा केल्या. सॉल्ट आणि विराटमुळे बंगळुरूचा संघ पुन्हा एकदा विजयी झाला.

सामना जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतले. त्या वेळेस बॅट चोरीला गेल्याचे विराट कोहलीच्या लक्षात आले. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर विराटने त्याची किट बॅग चेक केली. त्याच्या बॅगेमध्ये सात ऐवजी सहाच बॅट होत्या. एक बॅट गायब झाल्याने कोहली हैराण झाला. त्याने अन्य खेळाडूंना बॅटबद्दल विचारले.

किटबॅगमधून बॅट चोरीला गेली की काय? असा प्रश्न विराट कोहलीला पडला. ड्रेसिंग रुममध्ये तो बॅट शोधत होता. टीममधील इतर सदस्य आणि कोच यांनी आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नाही असे विराटला सांगितले. शेवटी टीम डेव्हिडने त्याच्या किटबॅगमधून विराट कोहलीची हरवलेली बॅट काढली. टीम डेव्हिडने मस्करी करत असल्याचे सांगून मी तुझी बॅट उसनी घेतली होती असे सांगितले. विराटसोबत टीम डेव्हिडसह इतर आरसीबी खेळाडूंनी प्रँक केला. या घटनेचा व्हिडीओ बंगळुरूच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चाहते खुश आहेत. विराटने आयपीएल २०२५ मध्ये दोन सामन्यांमध्ये अर्धशतकीय खेळी केली आहे. एकूण सहा सामन्यात त्याने ६२.०० च्या सरासरीने २४८ धावा आहेत. विराटचा हा फॉर्म टिकून राहणे आरसीबीच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Gondia Travel: मुंबईवरून गोंदियाला प्रवास करणार आहात? जाणून घ्या रेल्वे, बस आणि विमानाचे सर्व पर्याय

IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Maharashtra Live News Update : पुढचा कार्यक्रम ३ वाजता समजेल- राज ठाकरे

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Jui Gadkari Photos: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत

SCROLL FOR NEXT