Manasvi Choudhary
आज होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
होळी या सणानिमित्त रंगाची उधळण केली जाते. पुरणपोळी, बर्फी या पदार्थांचे देखील सेवन केले जाते.
तर अनेक ठिकाणी होळी या सणाला खास थंडाई, भांग पितात. तुम्हाला माहितीये का? भांग प्यायल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात
भांग प्यायल्यानंतर भूक वाढते. तसेच सतत काहीना काही खाण्याची इच्छा होते.
अनेकांना भांग प्यायल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटते डोकं गरगर फिरल्यासारखे वाटते.
भांग प्यायल्यानंतर एखादी व्यक्ती नुसती हसत राहते किंवा रडते यामुळे भांग प्यायल्यानंतर हा बदल दिसून येतो.
भांग प्यायल्यानंतर व्यक्तीला आळस आणि सुस्ती येते. एकाच ठिकाणी तुम्ही पडून राहता तसेच खूप झोप येते.