अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने 155 धावांचे लक्ष्य उभे केले.
शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर अपयशी ठरले.
वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 50 धावांची झुंजार खेळी केली.
आयपीएल २०२६ च्या १९ व्या सीझनमधील अंतिम सामन्यात आरसीबी आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आलेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होतोय. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स घरच्या मैदानात ढेर झाली. निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून गुजरातच्या संघाने १५५ धावा केल्या. गुजरातकडून फलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने शानदार खेळी केली. त्याने ५ चौकारांच्या मदतीने ३७ चेंडूंमध्ये नाबाद राहत ५० धावा केल्या.
मात्र अंतिम सामन्यात ज्या स्टार फलंदाजांकजून शानदार खेळीची अपेक्षा होती ते अपयशी ठरले. शुभमन गिल, जोस बटलर आणि साई सुदर्शन पूर्णपणे अपयशी ठरले. दरम्यान बेंगळूरुसाठी रसिक सलामदारने सर्वाधिक तीन बळी घेतले. सामन्यात, बेंगळूरुचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.
मात्र गुजरात टायटन्सचा संघ सुरुवातीपासूनच अडचणीत दिसत होता. गुजरातच्या फलंदाजीत आत्मविश्वास काहीसा कमी दिसला. कर्णधार शुबमन गिल अवघ्या १० धावांवर बाद झाला तेव्हा संघाच्या २२ धावा झाल्या होत्या. यानंतर संघाला २६ धावांवर दुसरा, ५५ धावांवर तिसरा, ७३ धावांवर चौथा, ९९ धावांवर पाचवा, ११५ धावांवर सहावा, १४२ धावांवर सातवा आणि १५१ धावांवर आठवा धक्का बसला.
सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या सुंदर व्यतिरिक्त, साई सुदर्शनने १२ धावा, कर्णधार शुबमन गिलने १० धावा, निशांत सिंधूने २० धावा, जोस बटलरने १९ धावा, अर्शद खानने १५ धावा, राहुल तेवतियाने ०७ धावा, रशीद खानने ०७ धावा आणि कागिसो रबाडाने संघासाठी ०३* धावा केल्या. बेंगळूरु संघ साहजिकच आपले सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. संघाने आपले पहिले विजेतेपद गेल्या हंगामात, २०२५ मध्ये जिंकले होते. आता कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली बेंगळूरु आपले सलग दुसरे विजेतेपद मिळवू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.