

स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सामन्यातील प्रत्येक विकेटचा मोठ्या उत्साहाने सेलिब्रेशन करतो. त्याचा उत्साह आणि ऊर्जा स्पष्टपणे जाणवत असते. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यातही तेच चित्र आपल्याला दिसलं. शुभमन गिल बाद झाल्यावरही त्याने त्याच जोशात आनंद साजरा केला. त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरात टायटन्सचा (जीटी) कर्णधार गिलला विजेतेपदाच्या सामन्यात मोठा धक्का बसला. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या गिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूविरुद्ध ८ चेंडूंमध्ये दोन चौकारांसह केवळ १० धावा करता आल्या. तिसऱ्या षटकात तो वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा बळी ठरला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने गिलचा अप्रतिम झेल घेतला.
गिलने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फटका नीट बसला नाही. चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागला आणि हवेत गेला. त्यानंतर पाटीदारने मिड-ऑनवरून मिड-ऑफपर्यंत धावत अप्रतिम घेतला.
पाटीदारनं झेल घेतल्यानंतर कोहलीला खूप आनंद झाला. कोहलीचं सेलिब्रेशनचा अंदाज खूप आक्रमक होता. गिल बाद होण्याने विराट कोहली खूप आनंदी झाला, कारण त्याला माहिती होतं की, जर गिल जास्त वेळ खेळला असता, तर आरसीबीसाठी अडचणीचं ठरलं असतं. आरसीबी गतविजेती असून सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याचे त्यांचे ध्येय आहे.
आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात गिलने १६ सामन्यांमध्ये ४५.७५ च्या सरासरीने ७३२ धावा केल्या. त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली. तो त्या हंगामातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.