RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका महिलेने यश दयालवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवत मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा दावा महिलेने केला. हे प्रकरण आता मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. मागील पाच वर्षांपासून मी यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होते, असे महिलेने म्हटले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये यश दयाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता. आरसीबीच्या ऐतिहासिक विजयात त्याचा मोठा वाटा होता. आता तो शारीरिक शोषणाच्या आरोपांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. लग्नाचे आश्वासन देत शोषण केल्याचा एका महिलेने यश दयालने केला आहे. याशिवाय यश माझ्यासह अनेक महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होता असा दावा देखील त्या महिलेने केला आहे.
'मी यशला २०२० पासून ओळखते. यशने त्याच्या कुटुंबीयांनी अनेकदा माझी ओळख करुन दिली. मी त्याच्या घरी राहिली आहे. पण गेल्या अडीच वर्षात तो अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यापैकी तीन मुली माझ्या संपर्कात आहेच. या मुलींना देखील यश दयालने फसवले आहे', असा दावा महिलेने केल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. होणाऱ्या आरोवांवर यश दयाल किंवा त्याच्या कुटुंबियांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
यश दयाल आणि त्या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०२२ चा आहे. त्यावेळेस यश दयाल गुजरात टायटन्समध्ये होता. आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्याच्या वेळेस महिलेने यश दयालसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. या व्हिडीओ, फोटोंमुळे ही महिला यश दयालच्या संपर्कात होती असे काहीजण म्हणत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.