ravindra jadeja  twitter
क्रीडा

Ravindra Jadeja: 'त्याला क्रिकेटर केलं नसतं तर बरं झालं असतं'; पत्नीसोबत वेगळं राहणाऱ्या रवींद्र जडेजाच्या वडिलांचा संताप

Ravindra Jadeja Reply On Father Allegations: जडेजा आपल्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja Reply On Father Allegations:

भारतीय संघातील खेळाडू रविंद्र जडेजा हा जगातील सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याने अनेकदा दमदार कामगिरी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे.

मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर दुसऱ्या कसोटीतून त्याला दुखापतीमुळे संघाहबाहेर व्हावं लागलं. तो तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. दरम्यान जडेजा आपल्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

रविंद्र जडेजाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने गुजराती भाषेत लिहीलंय की, ‘मुलाखतीत जे काही सांगण्यात आलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. याला काहीच अर्थ नाही. मी अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे कृत्य निंदनीय असून मला देखील खुप काही सांगायचं आहे. मात्र मी आता नाहीतर योग्य वेळी बोलणार आहे.’ ( Cricket news in marathi )

जडेजा असं का म्हणाला?

रविंद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध जडेजा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी एका स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘माझा आणि माझ्या मुलाचा काही एक संबंध नाही. जेव्हापासून त्याचं लग्न झालंय तेव्हापासून तो पूर्णपणे बदलला आहे. त्याला मी क्रिकेटर नसतं केलं तर बरं झालं असतं. माझा मुलगा माझ्याजवळ असता.’

रविंद्र जडेजाच्या वडिलांनी सांगितलंय की ,रविंद्र आणि त्यांची सून रिवाबासोबत त्यांचं बोलणं होत नाही. ते आम्हाला बोलवत नाही आणि आम्हीही त्याला बोलवत नाही. आमच्यात काहीच नातं शिल्लक राहिलेलं नाही. ५ वर्षांपासून मी नातवाचं तोंड पाहिलेलं नाही.’असं जडेजाचे वडील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT