Ind Vs Eng Test मालिकेमधील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलने कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना गमावला. खराब क्षेत्ररक्षण आणि मधल्या फळीनंतरच्या खेळाडू लागोपाठ बाद झाल्याने भारताचा पराभव झाला. आता दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये शुभमन गिलच्या नेतृत्त्वाचा कस लागणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणावर रवी शास्त्री यांनी भाष्य केले आहे.
शुभमन गिलची खेळण्याची शैली त्याला एक उत्तम खेळाडू बनवेल. जर गिल नेतृत्त्वामध्ये फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही, तर मी निराश होईन. गिल जेव्हा फलंदाजी करण्यासाठी येतो, तेव्हा त्याची चमकदार शैली दिसून येते. जर अनुभवातून शिकत गेला आणि त्याने परिस्थितीशी जुळवून घेतले, तर तो खूप पुढे जाईल, असे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
'शुभमन गिलला भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तीन वर्ष मिळायला पाहिजेत. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेमध्ये काय घडत आहे याच्या आधारावर निर्णय घेतले जाऊ नये. संघ व्यवस्थापनाने गिलला ३ वर्षांसाठी पूर्ण पाठिंबा दिला, तर तो सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेल', असे वक्तव्य रवी शास्त्री यांनी केले.
भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला असला, तरी कर्णधार शुभमन गिलने त्याच्या वैयक्तिक कामगिरीमध्ये सुधारणा केली आहे. कर्णधार म्हणून खेळताना त्याने सामन्याच्या पहिल्याच डावात गिलने १४७ धावांची दमदार खेळी केली. पुढील सामन्यांमध्ये गिलच्या नेतृत्त्वात भारताचा संघ कमबॅक करेल असा चाहत्यांना विश्वास आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.