Rashid Khan catch twitter
Sports

Rashid Khan Catch Video: लईच भारी ! राशिद खानने टिपला ‘कॅच ऑफ द सिझन’,व्हिडिओ पाहून व्हाल अवाक् - VIDEO

Rashid Khan: राशिद खानने एक भन्नाट झेल टिपला आहे.

Ankush Dhavre

GT VS LSG IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक जबरदस्त कॅचेस पकडले गेले आहेत. कोणी धावत जाऊन डाईव्ह मारत कॅच पकडत आहे. तर कोणी बाऊंड्री लाईनवर उडी मारून कॅच पकडत आहे.

दरम्यान गुजरात टायटन्स विरुध्द लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघातील गोलंदाज राशिद खानने एक भन्नाट झेल टिपला आहे.

ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Rashid Khan Catch Video)

राशिद खानचा भन्नाट झेल.. गुजरात टायटन्स संघातील खेळाडू राशिद खान हा एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. तो फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणात देखील संघासाठी बहुमूल्य योगदान देत असतो. नुकताच लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने काईल मेयर्सचा एक अप्रतिम झेल टिपला आहे.

गुजरातने दिलेल्या २२८ धावांचा पाठलाग करताना लखनऊने आक्रमक सुरुवात केली होती. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून काईल मेयर्सने ४८ धावांची खेळी केली. तर झाले असे की, काईल मेयर्स ४८ धावांवर फलंदाजी करत असताना ९ वे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा गोलंदाजीला आला होता. त्यावेळी स्लोवर चेंडू टाकला.

ज्यावर काईल मेयर्सने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. चेंडू हवेत गेला, त्यावेळी राशिद खान धावत आला आणि उजव्या बाजूला डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. (Latest sports updates)

गुजरातचा जोरदार विजय..

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने जोरदार कामगिरी करत ५६ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर २२७ धावांचा डोंगर उभारला होता. या डावात शुभमन गिलने २ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली.

तर वृद्धिमान साहाने ८१ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकने ७० धावांची खेळी केली. तर काईल मेयर्सने ४८ धावा चोपल्या.

मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने लखनऊला या सामन्यात ५६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT