GT vs LSG Match Result: छोटा भाऊ पडला मोठ्या भावावर भारी! LSG वर गुजरातचा दणदणीत विजय

GT vs LSG Match Highlights: आजचा सामना हा हार्दिक पंड्या विरुद्ध क्रूणाल पंड्या असा होता
gt vs lsg ipl 2023
gt vs lsg ipl 2023 saam tv
Published On

GT vs LSG IPL 2023: आजचा सामना हा हार्दिक पंड्या विरुद्ध क्रूणाल पंड्या असा होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात लखनऊ सुपर संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने ५६ धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातचे गुण आता १६ झाले आहेत. तर लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे.

gt vs lsg ipl 2023
GT VS LSG Weather Report: आज IPL स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादांच घडणार असं काही, मात्र पाऊस घालणार खोळंबा?

गुजरातने उभारला २२७ धावांचा डोंगर..

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्स संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. गुजरात टायटन्स संघाकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी जोरदार सुरुवात करून दिली.

दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. वृद्धिमान साहाने ४३ चेंडूंचा सामना करत ८१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. तर शुभमन गिलने ५१ चेंडूंचा सामना करत नाबाद ९४ धावांची खेळी केली.

या तुफानी खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार मारले. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याने २५ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने २ गडी बाद २२७ धावांचा डोंगर उभारला.

gt vs lsg ipl 2023
Cheteshwar Pujara: पुजारा म्हणजे शंभर नंबरी सोनं! IPL ला लाथ मारत पठ्ठा गाजवतोय इंग्लंडचं मैदान

डी कॉकची खेळी व्यर्थ...

इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर फलंदाज काईल मेयर्सने ४८ धावा चोपल्या. तर क्विंटन डीकॉकने ४१ चेंडूंचा सामना करत ७० धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र या दोघांना वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11:

गुजरात टायटन्स:

वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

लखनऊ सुपर जायंट्स:

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com