GT VS LSG Weather Report: आज IPL स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादांच घडणार असं काही, मात्र पाऊस घालणार खोळंबा?

GT vs LSG IPL 2023: आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत
gt vs csk
gt vs csk saam tv
Published On

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल डेकर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात क्रुणाल पंड्या (Krunal Pandya) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हे दोघे आमने सामने येणार आहेत. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

तर क्रुणाल पंड्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. आज दुपारी ३:३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

gt vs csk
Cheteshwar Pujara: पुजारा म्हणजे शंभर नंबरी सोनं! IPL ला लाथ मारत पठ्ठा गाजवतोय इंग्लंडचं मैदान

गुजरात टायटन्स संघाने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघावर जोरदार विजय मिळवला आहे. ज्यामुळे गुजरात टायटन्स संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

गुजरातचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर लखनऊचा संघ ११ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळू शकते. (Latest sports updates )

gt vs csk
IPL Mystery Girl: ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! जुही सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

या सामन्यात हार्दिक पंड्या एकीकडून तर दुसरीकडून क्रुणाल पंड्या नेतृत्व करताना दिसून येणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासतात पहिल्यांदाच असं घडणार आहे की, दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध नेतृत्व करताना दिसून येणार आहेत.

तसेच दोन्ही संघांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ ३ वेळेस आमने समाने आले आहेत. या तीनही सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स संघाने बाजी मारली आहे. तसेच आज होणाऱ्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता नाहीच्या बरोबर असणार आहे. (GT vs LSG Weather Report)

gt vs csk
Yuvraj Singh On IPL Fight: 'थंड घ्या भावांनो..', विराट - गंभीर वादात आता सिक्सर किंगची उडी,म्हणाला...

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग 11(GT vs LSG playing 11)

गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल.

लखनऊ सुपर जायंट्स- काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या (कर्णधार), के गौतम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसीन खान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com