IPL Mystery Girl: ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! जुही सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

IPL Mystery Girl Ritabhari Chakraborty: जुही चावलासोबत असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
Ritabhari Chakraborty
Ritabhari Chakrabortyipl

Mystery Girls In IPL: गुरुवारी हैदराबादच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली आणि सनरायझर्स हैदराबाद संघावर ५ धावांनी विजय मिळवला.

मिस्ट्री बॉलर वरूण चक्रवर्ती या सामन्याचा हिरो ठरला. दरम्यान या सामन्यात एक जुही चावलासोबत असलेल्या एका मिस्ट्री गर्लचा देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोण आहे ही मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या. (Ritabhari Chakraborty)

Ritabhari Chakraborty
Gautam Gambhir Reaction: चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराटचं नाव ऐकून गंभीर पुन्हा एकदा भडकला, रागात थेट..- VIDEO

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना पाहण्यासाठी सहमालकीन जुही चावलाने स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. जुहीसोबत एक तरुणी कोलकाता नाईट रायडर्स संघाला सपोर्ट करताना दिसून आली होती.

जुही चावला नेहमीच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजेरी लावत असते. ही तरुणी तिच्यासोबत असल्याचे दिसून आले होते. मात्र ही तरुणी आहे तरी कोण? (Who Is Ritabhari Chakraborty)

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा हा सामना पाहण्यासाठी आलेल्या तरुणीचे नाव रिताभरी चक्रवर्ती असे आहे. या सामन्यापूर्वी जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत सामना रंगला होता.

त्यावेळी देखील रितभरी चक्रवर्तीने हजेरी लावली होती. जुही चावलासोबत दिसून आल्याने तिची एकच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (Latest sports updates)

Ritabhari Chakraborty
India vs Pakistan, World Cup: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी BCCI ची जोरदार तयारी! जाणून घ्या कुठे आणि कधी रंगणार सामना

कोण आहे रितभरी चक्रवर्ती

रितभरी चक्रवर्ती ही बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे इंस्टाग्रामवर ३ मिलियन पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. इतकंच नव्हे तर तिने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसह देखील काम केलं आहे. रितभरी चक्रवर्ती दिसायला सुंदर आहे. तसेच ती आपल्या बोल्ड लूकने सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट संघाकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली.

तर कर्णधार नितीश राणाने ४२ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. कोलकाताने या डावात ९ गडी बाद १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमने सर्वाधिक ४१ तर हेन्री क्लासेनने ३६ धावांची खेळी केली.

हे दोघे जेव्हा खेळत होते. त्यावेळी असे वाटत होते की, हैदराबाद संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघाला ५ धावांनी विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com