rashid khan snake style six during practise video viral amd2000 twitter
Sports

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

Rashid Khan Six Video: गुजरात टायटन्स संघातील अनुभवी गोलंदाज राशिद खानला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

Ankush Dhavre

गुजरात टायटन्स संघातील अनुभवी गोलंदाज राशिद खानला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात तो आगळा वेगळा शॉट खेळताना दिसून येत आहे. सराव करताना राशिदने मारलेला हा शॉट पाहून गोलंदाजानेही त्याचं कौतुक केलं.

गुजरात टायटन्स संघाकडून खेळत असलेल्या राशिद खानचा हा व्हिडिओ अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, तो स्टान्स घेतो आणि तिन्ही स्टम्प सोडून उभा राहतो.

राशिद खान स्टम्प सोडून उभा आहे, हे पाहून गोलंदाज त्याला सरळ चेंडू टाकतो. गोलंदाजाने स्टम्प लाईनवर टाकलेला हा चेंडू राशिद खान थर्ड मॅनच्या वरुन फेकून देतो. त्याच्या हा स्नेक स्टाईल शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. त्याच्या या व्हिडिओवर आयर्लंड संघातील जोशुआ लिटिल, ऑस्ट्रेलियाचा स्पेंसर जॉनसनसारख्या खेळाडूंनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आयपीएल २०२४ स्पर्धेत असा राहिलाय रेकॉर्ड..

राशिद खानच्या आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३१.६३ च्या सरासरीने ८ गडी बाद केले. त्याने ७.४४ च्या इकॉनमीने धावा खर्च केल्या आहेत. यासह फलंदाजीत त्याने २१ च्या सरासरीने आणि १४७.३७ च्या सरासरीने ८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान ३१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: . भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध – छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT