rashid khan twitter
क्रीडा

Rashid Khan Viral Video: राशिद खान आपल्याच सहकाऱ्यावर भडकला!लाईव्ह सामन्यात बॅट फेकून मारली; पाहा VIDEO

Rashid Khan Throws Bat: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने आपल्याच सहकाऱ्यावर बॅट फेकून मारली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील शेवटचा अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. यासह ऑस्ट्रेलियाचा संघही या सामन्यावर लक्ष लावून होता. कारण तिन्ही संघांना सेमिफायनमध्ये जाण्याची संधी होती.

या सामन्यात अफगाणिस्तानने बाजी मारली आणि सेमिफायनचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान पहिल्या डावात फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान आपल्या सहकाऱ्यावर भडकल्याचे पाहायल मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर झाले असे की,अफगाणिस्तान संघाची फलंदाजी सुरु असताना राशिद खान आणि करीन जनातची जोडी मैदानावर होती. हा प्रकार पहिल्या डावातील २० व्या षटकात घडली. नॉन स्ट्राईकला असलेल्या राशिदने १ धाव वेगाने पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्ट्राईकला असलेल्या करीन जनातने दुसरी धाव घेण्यास नकार घेतला आणि राशिद खानला मागे जायला सांगितलं. हे पाहून राशिद खान भडकला. त्याने करीमला बॅट फेकून मारली. त्यानंतर करीमने बॅट उचलून राशिदकडे परत आणून दिली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने ५५ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. तर राशिद खानने नाबाद १९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने २० षटकअखेर २० गडी बाद ११५ धावा केल्या.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी ११६ धावा करायच्या होत्या. तर सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी बांगलादेशला हे आव्हान १३ षटकात पूर्ण करायचं होतं. मात्र अफगाणिस्तानचा डाव १०५ डावांवर आटोपला. बांगलादेशकडून लिटन दासने नाबाद ५४ धावांची खेळी केली. बांगलादेशला हा सामना ८ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT