Afghanistan vs Uganda Highlights: युगांडाची लढत अपयशी! अफगाणिस्तानचा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय

Afghanistan vs Uganda Match News In Marathi: अफगाणिस्तान आणि युगांडा या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने शानदार विजय मिळवला आहे.
Afghanistan vs Uganda Highlights: युगांडाची लढत अपयशी! अफगाणिस्तानचा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय
afghanistan cricket teamtwitter
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील पाचव्या सामन्यात अफगाणिस्तान आणि युगांडा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा युगांडासाठी ऐतिहासिक सामना होता. कारण या संघाने पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात युगांडाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने १२५ धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर युगांडाने नाणेफेक जिंकला आणि अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या निर्णयाचं स्वागत करत अफगाणिस्तानने युगांडाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना रहमनुल्लाह गुरबाजने ४५ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची खेळी केली. तर इब्राहिम जदरानने ४६ चेंडूचा सामना करत ७० धावा केल्या. शेवटी मोहम्मह नबीने नाबाद १६ धावा केल्या. अफगाणिस्तानने २० षटकअखेर १८३ धावा केल्या.

Afghanistan vs Uganda Highlights: युगांडाची लढत अपयशी! अफगाणिस्तानचा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय
IND vs PAK: 'भीती तर वाटणारच ना..', भारत- पाकिस्तान सामन्याआधीच बाबर आझम टेन्शनमध्ये

युगांडाला आपला पहिला सामना जिंकण्यासाठी १८४ धावांची गरज होती. मात्र हे आव्हान युगांडाच्या फलंदाजांना पूर्ण करता आलेली नाही. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या युगांडासाठी हे आव्हान तसं मोठंच होतं. या धावांचा पाठलाग करताना या संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही.

Afghanistan vs Uganda Highlights: युगांडाची लढत अपयशी! अफगाणिस्तानचा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय
ICC Prize Money: कोणताच संघ रिकाम्या हाती जाणार नाही! ICC कडून रेकॉर्ड ब्रेकिंग प्राईज मनीची घोषणा

सलामीला आलेला रोनक पटेल ४, तर सायमन सेसाझी ४ धावा करत माघारी परतला. युगांडाकडून फलंदाजी करताना ऑबिन्सन ओबुयाने सर्वाधिक १४ धावा केल्या. तर रियाजत अली शहाने ११ धावा केल्या. या धावांचा बचाव करताना अफगाणिस्तानकडून फजहलूक फारुकीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर राशिद खान आणि नवीन उल हकने प्रत्येकी २-२ आणि मुजीब उर रहमानने १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com