Rajasthan Royals X
Sports

IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, तगडा खेळाडू संघाबाहेर; प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशांवर पाणी?

Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सचा आयपीएल २०२५ मध्ये खराब फॉर्म सुरु आहे. अशातच त्यांच्या संघातील तगडा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याचा राजस्थानचा प्रवास अधिक खडतर होईल असे काहीजण म्हणत आहेत.

Yash Shirke

Rajasthan Royals IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या पॉईंट्स टेबलवर राजस्थान रॉयल्सचा संघ आठव्या स्थानी आहे. राजस्थानच्या संघाने एकूण ८ सामने खेळले आहेत. त्यातील ६ सामन्यांमध्ये राजस्थानचा पराभव झाला आहे. राजस्थानचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेत खूप मागे पडला आहे. खराब फॉर्म सुरु असताना राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने राजस्थानच्या चिंता वाढल्या आहेत.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात फलंदाजी करताना संजू सॅमसनला दुखापत झाली होती. त्रास सहन न झाल्याने संजूने रिटायर्ड हर्ट होऊन डगआउटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. दुखापतीच्या कारणामुळे लखनऊ विरुद्धच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले होते. आता २४ एप्रिल रोजी खेळल्या जाणाऱ्या राजस्थान विरुद्ध बंगळुरू सामन्यात संजू खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

'संजू सॅमसन सध्या दुखापतीतून सावरत आहे. तो सध्या जयपूरमधील राजस्थान रॉयल्सच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत आहे. रिहॅबमध्ये असल्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नाही. संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. लवकरच तो पुनरागमन करेल अशी आशा आहे', असे राजस्थान रॉयलच्या अधिकृत पत्रकामध्ये म्हटले आहे.

लखनऊ विरुद्धच्या सामन्यात राजस्थानने संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी दिली होती. या संधीचे वैभवने सोने केले. २० चेंडूंमध्ये ३४ धावा करत त्याने सर्वांची मने जिंकली. आता संजू आरसीबी विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याने पुन्हा वैभवला संधी दिली जाईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT