rajasthan royals star batsman riyan parag may include in team india for upcoming t20 world cup 2024 amd2000 twitter
Sports

T20 World Cup 2024: रियान परागला टीम इंडियात स्थान मिळणार? T-20 WC साठी झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली?

Riyan Parag In Team India: आयपीएल २०२४ स्पर्धेत रियान पराग शानदार फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. या हंगामातील प्रत्येक सामन्यात तो गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना दिसून आला आहे

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत रियान पराग शानदार फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. या हंगामातील प्रत्येक सामन्यात तो गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना दिसून आला आहे. गेल्या काही हंगामांमध्ये तो सुपरफ्लॉप ठरला होता. मात्र तरीही राजस्थान रॉयल्स संघाने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला. हा विश्वास सार्थ ठरवत त्याने संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. तो सुरुवातीपासूनच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. दरम्यान नुकताच रियान परागबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआयने) टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर देखील उपस्थित होते. या बैठकीत आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेबाबतच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत रियान परागबाबत देखील चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

रियानला भारतीय संघात स्थान मिळणार?

आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रियान पराग हे नाव देखील आघाडीवर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडत अनेक मोठ मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. दरम्यान त्याला भारतीय संघा स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपतेय.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत..

रियान पराग हा आयपीएल २०२४ स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ६३.६० च्या सरासरीने ३१८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतकं देखील झळावली आहेत. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५१ समन्यांमध्ये ११३.८ रासरीने ९१८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT