Sakshi Sunil Jadhav
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर सगळ्यात आधी हृदयाचे ठोके थांबतात. त्यानंतर मेंदू,लिव्हर, किडनी हे महत्त्वाचे अवयव काम करणं बंद करतात.
मेल्यावर काहीच वेळात शरीरावर सूक्ष्मजीवांचा प्रभाव वाढायला लागतो. त्यामुळे शरीर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मृताचा वास येतो.
शरीराचे इतर अवयव काम करत नसले तरी मानवी त्वचा काही काळ जिवंत राहते. ती मेल्यावरही आपलं काम सुरू ठेवते.
त्वचेमध्ये असणाऱ्या पेशी इतर अवयवांतल्या पेशींपेक्षा उशीराने मरतात. त्यामुळे त्वचा बराच वेळ अॅक्टीव्ह राहते.
त्वचा जीवंत राहण्याचं कारण त्वचेला ऑक्सिजनची गरज खूप कमी असते. त्यामुळे हृदय बंद पडल्यानंतर त्वचेतल्या पेशी लगेच निष्क्रिय किंवा काम करणं थांबवत नाहीत.
तज्ज्ञांच्या मते काही प्रकरणांमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर १२ ते २४ तासांपर्यंत त्वचेतल्या पेशी वातावरणातील आर्द्रतेतून ऊर्जा घेऊन जिवंत राहतात.
याच कारणामुळे देहदानाच्या प्रक्रियेत उशीर झाला तरीही मृत व्यक्तीची त्वचा सुरक्षितपणे काढता येते.
मानवी शरीराची ही रचना ही आश्चर्यचकीत करणारी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मृत्यूनंतरही काही काळ जिवंत राहणारी त्वचा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.