Sakshi Sunil Jadhav
दुध हे आपण सगळेच नेहमी पितो. काहीजण दूध पित नसतील तरी दुधाचा चहा, कॉफी, आईस्क्रीम असे दुग्धजन्य पदार्थ नेहमीच खात असतात.
दुधाच जास्त प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, फॉरस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन अशी तत्वे असतात, जी शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
दुध शरीरासाठी खूप फायदेशीर असतं म्हणून ते नुसतं पिणं लोकांना कंटाळवाणं वाटतं. म्हणून लोक त्याच्यासोबत आणखी काही पदार्थांचा समावेश करतात.
तज्ज्ञांच्या मते, दुधासोबत काही फळं किंवा काही पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. याने अपचनाच्या समस्याही वाढतात.
सगळ्यात आधी दूध आणि दही एकत्र खाणं टाळलं पाहिजे. कारण त्याने पोटाचे विकार होतात. जसं की पोट दुखी, गॅस इ.
तज्ज्ञांच्या मते, दुधासोबत कोणतीही आंबट फळं खाल्ली तर पित्ताच्या समस्या झटक्यात वाढतात. म्हणून संत्री, लिंबू अशी आंबट फळं दूधासोबत खाणं टाळावं.
आयुर्वेदानुसार दूध आणि आंबट फळं खाल्याने पित्तासोबत स्कीन इंफेक्शन, हाता-पायावर खाज किंवा पांढरे डाग येऊ शकतात.
केळी आणि दूध हे पदार्थ पचायला खूप जड असतात. त्यामुळे एका वेळी एकच फळ किंवा दूधच असा आहार घ्यावा असं तज्ज्ञ म्हणतात.
आयुर्वेदात गुळ आणि दूध हा चांगला पर्याय मानत असले तरी याचा तुमच्या पचनावर खूप परिणाम होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.