Bharat Jadhav
चटणी फार आवडीने खाल्ली जाते. अनेक प्रकारच्या चटणी केल्या जातात. आज आपण खजूर चटणीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला बेचव वाटत असेल तर तुमच्यासाठी ही चटणी बेस्ट आहे. गोड, थोडीशी आंबट आणि मसाल्यांचा समतोल स्वाद असल्यामुळे ही चटणी चवीला मस्त आहे.
ही खजूर चटणी चाट, समोसा, कचोरी, ढोकळा, पकोडे किंवा साध्या भाजीसोबतही खाल्ली तर तुमच्या स्नॅक्सची मज्जा अजून जास्त वाढेल.
खजूर चटणी एकदा नीट तयार करुन ठेवली तर ही चटणी साधारणपणे पंधरा दिवस सहज टिकू शकते.
खजूर, चिंच, पाणी, मीठ, गूळ, लाल तिखट, सुंठ, चाट मसाला
खजुराच्या बिया काढून घ्यायच्या. तसेच चिंचेच्या बिया काढून घ्यायच्या. एका भांड्यात खजुर आणि चिंच गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवा.
गूळ बारीक चिरुन घ्या. २० मिनिटांनंतर एका मिक्सरच्या भांड्यात भिजलेले खजुर आणि चिंच घ्या. त्याची पेस्ट करा.
एका गाळणीच्या मदतीने खजूर-चिंचाची पेस्ट गाळून घ्या. त्यातील चोथा काढून टाका. गाळल्याशिवाय चटणी करू नका.
वाटून झालेली पेस्ट एका पातेल्यात घ्या. त्यात चमचाभर लाल तिखट तसेच थोडे मीठ घाला. यासह चमचाभर सुंठ, थोडा चाट मसाला घाला. आणि हो किसलेला गूळासह अगदी थोडे पाणी घाला. हे मिश्रण ढवळून काढा. ते गॅसवर मंद आचेवर उकळू घ्या. पाच ते दहा मिनिटे ढवळत राहा.