Onion Chutney Recipe: ५ मिनिटांत बनवा चमचमीत कांदा चटणी; बनवायला पटकन, खायालाही १ नंबर

Bharat Jadhav

कांदा चटणी

ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कांदा शिजवण्याची गरज नसते. कच्च्या कांद्याची चटणी चवीला छान लागते. शिवाय अगदी झटपट बनते.

साहित्य

२ मध्यम आकाराचे कांदे, १ चमचा धनेपूड, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, ५ ते ६ लसूण पाकळ्या, चवीनुसार लाल तिखट आणि मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी आणि हिंग

कशी बनवणार चटणी

कांद्याची झटपट चटणी करण्यासाठी कांदाची देठं काढून घ्यावीत. त्यानंतर कांद्याची वरील भाग काढून कांदे ओबडधोबड चिरून घ्यावीत.

लसूण आणि कांदा बारीक करा

यानंतर चिरलेले कांदे आणि लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात घालून कुटून घ्या.

तर साहित्यही टाका

त्यातच तिखट, मीठ, धनेपूड घाला आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित कुटून घ्यावे.

मिक्स करा

कुटलेली चटणी एका भांड्यामध्ये काढा आणि त्यावर कडकडीत खमंग फोडणी घाला. फोडणीसाठी तेल गरम करा त्यात जिरे टाका. त्यानंतर ते तेल चटणीत टाकून द्या. मग ते योग्यपद्धीतने मिक्स करा.

मसाला कोणता वापरणार

चटणीचा स्वाद वाढवायचा असेल तर यात तुम्ही १ चमचा पावभाजी मसाला आणि १ चमचा किचन किंग मसालाही टाकू शकता.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Khandeshi Papad Kushmur Khuda Recipe: खानदेशी कुसमुर पापड खुडा