World Cup Warm Up Games: श्रेयस की सूर्या? कोणाला मिळणार संधी? इंग्लंडविरूद्धच्या सराव सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग ११

India vs England, Warm Up Games: या सामन्यासाठी अशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११.
world cup 2023 warm up games india vs england team india predicted playing 11 know who will be picked suryakumar yadav or shreyas iyer amd2000
world cup 2023 warm up games india vs england team india predicted playing 11 know who will be picked suryakumar yadav or shreyas iyer amd2000Saam tv news

India vs England, Warm Up Match:

वर्ल्डकपच्या रंगीत तालीमसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघ पहिला सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्धचा हा सामना गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग ११ सह मैदानात उतरू शकतो. दरम्यान या सामन्यासाठी कोणाला संधी मिळू शकते जाणून घ्या.

world cup 2023 warm up games india vs england team india predicted playing 11 know who will be picked suryakumar yadav or shreyas iyer amd2000
Asian Games 2023: साकेथ मायनेनी,रामकुमार रामनाथन जोडीची कमाल;टेनिस डबल्समध्ये भारताला रौप्यपदक

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११..

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर येऊ शकते. तर विराट कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.

सुरुवातीचे ३ फलंदाज निश्चित आहेत. मात्र चौथ्या क्रमांकाचा पेच अजूनही कायम आहे. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी श्रेयस अय्यरला खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली होती.

त्यामुळे वर्ल्डकपमध्येही तो चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. तर केएल राहुल यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. हार्दिक पंड्याला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. तो सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. तर अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. (Latest sports updates)

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

या सामन्यासाठी फिरकी गोलंदाज आर अश्विनला संधी मिळणं कठीण आहे. तर कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना संधी मिळणं निश्चित आहे. तर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी/शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com