India-England First Test Match Weather Report saam tv
Sports

IND VS ENG: पहिल्या दिवशी पावसाचा 'खेळ'! INDvsENG यांच्यातला हेड टू हेड रेकॉर्डमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या कशी असेल Playing XI

India-England First Test Match Weather Report: आजपासून इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यातील ५ सामन्यांच्या टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. मुख्य म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृ्तीनंतर ही पहिली सिरीज असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज क्रिकेटप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर आज भारताचा पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला सामना आज खेळला जाणार आहे.

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टेस्ट सामना लीड्समधील हेडिंग्लेमध्ये खेळवला जाणारे. या सामन्यात दोन्ही टीम्समध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मात्र पावसाचा सामन्यावर थोडासा परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता खूपच कमी आहे. मात्र त्यानंतर पुढील चार दिवस हवामान सामन्यात व्यत्यय आणू शकतं.

पहिल्या टेस्ट सामन्यात कसं असेल हवामान?

पहिला दिवस

अ‍ॅक्यूवेदरच्या अहवालानुसार, लीड्समध्ये पहिल्या दिवशी हवामान स्वच्छ राहणार आहे. पहिला दिवस खूपच उष्ण असणार आहे. या दिवशी कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहणार आहे.

दुसरा- तिसरा दिवस

मात्र या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता ६६ टक्के आहे. तर तिसऱ्या दिवशी ६० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

चौथा-पाचवा दिवस

पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी चाहत्यांना जास्तीत जास्त क्रिकेट खेळ पाहायला मिळेल. या दिवशी पावसाची शक्यता २५ टक्के आहे. तर पाचव्या दिवशी पावसाची शक्यता ६४ टक्के असणार आहे.

हेड टू हेडचे आंकडे

  • एकूण सामने: 136

  • भारत जिंकला: 35

  • इंग्‍लंड जिंकली: 51

  • ड्रॉ : 50

पहिल्या सामन्यासाठी कशी असेल प्लेईंग ११

इंग्लंड

जैक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कप्तान), जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, ब्रॅडेन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

भारत

यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT