ENG vs IND 1st Test: लीड्स टेस्ट सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; स्टार फलंदाज जखमी

Karun Nair Injury on Prasidh Krishna Ball: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २० जूनपासून लीड्स येथे होणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघाचं टेन्शन वाढलंय. बुधवारी १८ जून रोजी सराव सत्रादरम्यान फलंदाज करुण नायर जखमी झालाय.
ENG vs IND 1st Test
Karun Nair Injury on Prasidh Krishna Ballsaam tv
Published On

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना २० जूनपासून होणार आहे. इंग्लंडमधील लीड्समध्ये हा सामना खेळला जाणार आहे. परंतु टीम इंडियाचे टेन्शन वाढलंय. कारण भारतीय संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू जखमी झाले आहेत. भारतीय संघाचा ३३ वर्षीय फलंदाज करुण नायर या कसोटीत खेळेल अशी अपेक्षा आहे. पण या सामन्याच्या सुरुवातीपूर्वी ३३ वर्षीय क्रिकेटपटूशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आलीय. (Karun Nair Injury on Prasidh Krishna Ball)

बुधवारी १८ जून रोजी, नेट सराव करताना त्याला किरकोळ दुखापत झालीय. प्रसिद्ध कृष्णाच्या शॉर्ट बॉलचा सामना करताना त्याला दुखापत झाली. प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू करुणच्या पोटाला लागला. दरम्यान ही दुखापत किरकोळ होती, त्यामुळे कोणतीही गंभीर समस्या निर्माण झाली नाही.

नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना करुण नायरला फटका मारण्यासाठी उशिर झाला. आणि प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू चुकला आणि नायरच्या पोटावर लागला. चेंडू त्याला लागताच कृष्णा लगेच त्याच्याकडे धावला. नायरला काही सेकंद वेदना जाणवल्या, परंतु काही वेळाने तो हसताना दिसला. त्यानंतर त्याने फिजिओ आणि संघातील इतर खेळाडूंना त्याच्या शरीरावर चेंडूचे चिन्हही दाखवले.

ENG vs IND 1st Test
IND vs ENG Test: टीम इंडियात मोठा बदल; शुबमन गिल, पंतबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अखेर मिळाली

दरम्यान आता उद्या हेडिंग्ले कसोटी सामना होणार आहे. त्याआधी होणाऱ्या नेट सरावाच्या सत्रात ही दुखापत गंभीर आहे की नाही हे ठरवले जाईल. जखमीमुळे त्याच्या कसोटी पुनरागमनावर परिणाम होणार तर नाही ना? हे नेट सत्रात कळेल. दरम्यान करुण नायरची कसोटी संघात निवड झाली तेव्हा त्याने इंग्लंडच्या भूमीवर भारताच्या अ संघासाठी चांगली कामगिरी केलीय. त्याने कॅन्टरबरी येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध २०४ धावा केल्या. नॉर्थम्प्टनमधील दुसऱ्या अनऑफिशियल कसोटीत त्याने ४० आणि १५ धावांची खेळी केली.

करुण नायरचा कसोटी करिअर

करुण नायरचा कसोटी क्रिकेट करिअर ग्राफ खूप चढ-उताराचा राहिलाय. २०१६ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध ३०३ धावांची शानदार खेळी खेळल्यानंतर काही महिन्यातच त्याचा फरफॉर्मस कमी झाला. २०१७ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्याने ३ कसोटी सामन्यांमध्ये फक्त ५३ धावा केल्या.

यानंतर २०१८च्या इंग्लड दौऱ्यात तो बाकावरच बसून होता. परंतु नायरनं कधीच हार मानली नाही. तो कायम देशांतर्गतमधील सामने खेळत राहिला. त्यानंतर २०२४-२५ च्या देशांतर्गत सामन्यामध्ये शानदार प्रदर्शन केलं. यात त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ८६३ धावा केल्या. यासर्व कारणामुळे त्याला परत एकदा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com