Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह कसोटी संघाचा कॅप्टन का होऊ शकला नाही? स्वतःच सांगितलं कारण

Rohit Sharmaने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवले जाईल अशा चर्चा रंगल्या होत्या. पण बुमराहऐवजी शुभमन गिल कर्णधार बनला. कर्णधारपदाशी संबंधित चर्चांवर बुमराहने प्रतिक्रिया दिली आहे.
Jasprit Bumrah
Jasprit Bumrahx
Published On

Team India : २० जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडे कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आता शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारताचा संघ युवा खेळाडूसह मैदानात उतरणार आहे. बीबीसीआयने घोषणा करण्यापूर्वी जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद जाऊ शकते अशा चर्चा रंगल्या होत्या.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराहने टीम इंडियाचे नेतृत्त्व केले होते. कसोटी मालिकेतील पहिला सामना बुमराहच्या नेतृत्त्वात भारताने जिंकला होता. त्यामुळे रोहितनंतर बुमराह कसोटी संघाचा कर्णधार होईल असे म्हटले जात होते. पण बीसीसीआयने शुभमन गिलला कसोटी संघाचे कर्णधारपद दिले. कर्णधारपदावरील चर्चांवर जसप्रीत बुमराहने मौन सोडले आहे.

Jasprit Bumrah
सोनमचं भयंकर रूप उघड; लग्नाआधी तीनदा, लग्नानंतर चौथ्यांदा आखला होता राजाच्या हत्येचा कट, आताही वाचला असता तर...

स्काय स्पोर्टवर भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली. 'बीसीसीआयची निवड समिती मला कर्णधार बनवू इच्छित होती. पण कामाच्या ताणामुळे मी स्वतः कर्णधारपद नाकारले. माझे कर्णधार होणे संघासाठी योग्य नव्हते. मी बीसीसीआयशी बोललो होतो. माझी शस्त्रक्रिया झाली होती, मी माझ्या पाठीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही सल्ला घेत होतो. मी संपूर्ण मालिका खेळू शकणार नव्हतो. अशा परिस्थितीत कर्णधारपद स्वीकारणे संघासाठी योग्य ठरणार नाही', असे जसप्रीत बुमराह म्हणाला.

Jasprit Bumrah
Shocking : प्लीज खा ना...वहिनीला आईस्क्रीम देणं दीराला भोवलं, भावाच्या डोक्यात सनक अन् जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले

'जर कोणी एका मालिकेत तीन कसोटी सामने खेळणार असेल आणि दोन सामने बाहेर बसणार असेल, तर मालिकेत दोन वेगवेगळ्या खेळाडूंकडे कर्णधारपद दिले जाईल. दोन कर्णधार असतील, तर संघाचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच मी कर्णधारापदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढले. मी नेहमीच संघाला प्राधान्य देतो', असे वक्तव्य बुमराहने केले आहे.

Jasprit Bumrah
Doomsday Fish : त्सुनामी अन् विध्वंसक भूकंपाचे संकट, समुद्रातून मिळाले संकेत, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com