
Ind Vs Eng कसोटी मालिकेला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमर खेळला जाणार आहे. भारताचा संघ मागील काही दिवसांपासून बेकेनहॅममध्ये सराव करत होता. १७ जून रोजी संघ लीड्सला पोहोचला. त्यानंतर खेळाडूंनी सराव सत्रांमध्ये सहभाग घेतला. सराव सत्रादरम्यान संघातील काही खेळाडू फिल्डिंग कोचसोबत भांडत असल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शुभमन गिलसह संघातील अनेक खेळाडू मैदानात दिसत आहेत. सर्वजण फिल्डिंगचा सराव करताना दिसतात. अचानक कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा रागावून मोठ्याने ओरडताना दिसतात. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह देखील पुढे येतात. चारही गोलंदाज फिल्डिंग कोचकडे जात असल्याचे व्हिडीओत दिसते.
फिल्डिंग कोच टी दिलीप सर्वांना काहीतरी समजावून सांगत असल्याचे दिसते. ते बोलत असताना खेळाडूंनी दिलीप यांना घेरले. यादरम्यान जोराजोरात वाद सुरु झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. सर्वजण गंमत करत असल्याचे म्हटले जात आहे. हा वाद नसून टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये हलकीफुलकी मस्करी सुरु होती. गमतीशीर वादात गौतम गंभीर सामील झाल्याचेही व्हिडीओत पाहायला मिळाले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली अशा अनुभवी खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. युवा शुभमन गिलच्या नेतृत्त्वामध्ये टीम इंडियाचा तरुण संघ इंग्लंडला त्याच्या घरात जाऊन भिडणार आहे. उद्या म्हणजेच २० जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.