Pune : नणंदेच्या जाचाला कंटाळून महिलेची ६ वर्षीय मुलासह आत्महत्या, लिपस्टिकने लिहिली सुसाईड नोट; आत्महत्येचा व्हिडीओ आला समोर

Pune News : पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे एका महिलेने तिच्या सहा वर्षांच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. या महिलेने मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
Pune crime
Pune crimex
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या महिलेने पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली होती. महिलेने नणंदेच्या त्रासाला कंटाळून सहा वर्षीय मुलासह इ जाऊन उडी मारली होती. या महिलेने लिपस्टिकने सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव मयुरी देशमुख असे आहे. पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटीमध्ये काल (१८ जून) संध्याकाळी ६ च्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. कल्पक सोसायटीमध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबातील मयुरी देशमुखने तिच्या सहा वर्षांच्या मुलांसह आत्महत्या केली.

Pune crime
Jalna News: शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, शेतकऱ्यांचा पाटाच्या चारीवरून जीवघेणा प्रवास; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

मयुरी तिच्या सहा वर्षीय मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेली. तेथून दोघांनी खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी मयुरीने लिपस्टिकने सुसाईड नोट लिहिली होती. 'नणंदेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे', अशी सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.

Pune crime
Indrayani River Flood: इंद्रायणी नदीला पूर, वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला NDRF ने वाचवलं; रेस्क्यूचा थरारक VIDEO

सासरी नणंदेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने तिच्या सहा वर्षीय मुलासह इमारतीवरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या धक्कादायक घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Pune crime
Mumbai Metro: मेट्रो 3 स्टेशन पाण्यात! वरळी, BKC मध्ये गळती थांबेना; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com