Indrayani River Flood: इंद्रायणी नदीला पूर, वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला NDRF ने वाचवलं; रेस्क्यूचा थरारक VIDEO

Indrayani River: आळंदीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. पूरामध्ये वाहून जाणाऱ्या एका वारकऱ्याला वाचवण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या टीमने या वारकऱ्याचे प्राण वाचवले.
Indrayani River Flood: इंद्रायणी नदीला पूर, वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला NDRF ने वाचवलं; रेस्क्यूचा थरारक VIDEO
Indrayani River FloodSaam Tv
Published On

पुण्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला. या पूरामध्ये वारकरी वाहून जात होता. एनडीआरएफच्या टीमने या वारकऱ्याचा जीव वाचवला. एनडीआरएफच्या जवानांनी थेट नदीमध्ये उडी मारून या वारकऱ्याला बाहेर काढले. या रेस्क्यूचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

आळंदीमध्ये रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी सध्या दुथडी भरून वाहत असून संपूर्ण घाट पाण्याखाली गेला आहे. नदीला आलेल्या पूरादरम्यान एक वारकरी वाहून गेल्याची घटना घडली. एनडीआरफच्या टीमने या वारकऱ्याला रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप वाचवले. याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. इंद्रायणी नदीला आलेला पूर लक्षात घेता घाटावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Indrayani River Flood: इंद्रायणी नदीला पूर, वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला NDRF ने वाचवलं; रेस्क्यूचा थरारक VIDEO
Ratnagiri Rain News : रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती नियंत्रणात|VIDEO

आळंदी येथे इंद्रायणी नदीला आलेल्या पूरात वाहून जाणाऱ्या तरुणाचे प्राण एनडीआरएफच्या टीमने वाचवले. आज सकाळी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. इंद्रायणी नदी पात्रात एक वारकरी वाहून जात होता. त्याला पाहून इंद्रायणी नदीवरील पुलावर उभ्या राहिलेल्या वारकऱ्यांनी आरडाओरडा केला. या वारकऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी पळापळ केली. त्यांनी याबाबत एनडीआरएफच्या पथकाा सांगितले.

Indrayani River Flood: इंद्रायणी नदीला पूर, वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला NDRF ने वाचवलं; रेस्क्यूचा थरारक VIDEO
Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस! खडकवासला धरण ७५ टक्के भरले, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पूरामध्ये वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी नदीत उडी मारून तरुणाचे प्राण वाचवले आहेत. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तसेच आषाढी वारी आज देहू आणि आळंदीतून मार्गस्थ होत असल्याने एनडीआरएफचे पथक इंद्रायणी नदीकाठी तैनात ठेवण्यात आले आहे. याच पथकातील जवानांकडून नदीत वाहून जाणाऱ्या तरुणांचे प्राण वाचवण्यात आले आहे.

Indrayani River Flood: इंद्रायणी नदीला पूर, वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला NDRF ने वाचवलं; रेस्क्यूचा थरारक VIDEO
Shahapur Heavy Rain : रात्रभर मुसळधार पावसाने कानवे नदीला पूर; चरिव गावातील मंदिर पाण्याखाली, नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार पाऊस 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com