राहुल द्रविडनं दिला मुख्य प्रशिक्षपदाचा राजीनामा
आयपीएल २०२६ आधीच राजस्थान रॉयल्सचा मोठा धक्का
द्रविडच्या राजीनाम्याचं कारण काय? क्रिकेट वर्तुळातून आश्चर्य व्यक्त
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यानं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राहुलच्या राजीनाम्यासंदर्भातील माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. खरं तर प्रमुख खेळाडू संजू सॅमसन हा या हंगामात राजस्थान संघाकडून खेळणार नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. ही चर्चा सुरू असतानाच, राहुल द्रविडनं राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनानं ही अधिकृत माहिती दिली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२६ च्या पर्वाला सुरुवात होण्याआधीच आपला कार्यकाळ संपुष्टात आणणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल प्रवासात राहुल अनेक वर्षांपासून केंद्रस्थानी राहिला. त्याच्या नेतृत्वाचा खेळाडूंच्या एका पिढीवर विशेष प्रभाव राहिला आहे. संघात मूल्ये रुजवली आहेत आणि फ्रेंचाइजीच्या संस्कृतीवर एक अमिट छाप सोडली आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.
संघ व्यवस्थापन संरचनेच्या आढाव्याचा एक भाग म्हणून राहुलवर मोठी जबाबदारी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यानं ती स्वीकारली नाही. द्रविडनं दिलेल्या योगदानाबद्दल राजस्थान रॉयल्स, खेळाडू आणि जगभरातील त्याच्या लाखो प्रशिक्षकांकडून आभार, असेही निवेदनात म्हटले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये द्रविड यानं राजस्थान रॉयल्सचं मुख्य प्रशिक्षकपद भूषवलं होतं. १४ पैकी फक्त चार सामन्यांत विजय मिळवता आला होता. त्यामुळं गुणतालिकेत नवव्या स्थानी राहावं लागलं होतं. राजस्थान रॉयल्सचं प्रशिक्षपदपद भूषवण्याआधी तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. द्रविड आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं टी २० वर्ल्डकपचं जेतेपद पटकावलं होतं. तर २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ फायनलपर्यंत पोहोचला होता.
आयपीएल २०२५ मध्येच राजस्थान रॉयल्सच्या संघात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा होती. कर्णधार संजू सॅमसन हा संघ व्यवस्थापनावर नाराज होता. पण नंतर राहुल द्रविडनंच ते वृत्त फेटाळलं होतं. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं द्रविडनं त्यावेळी स्पष्ट केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.