MS Dhoni Angry Moments saam tv
Sports

MS Dhoni: फूड डिलीवरीवरून राडा; IPL मध्येच रागाच्या भरात धोनीने सोडलेलं हॉटेल, कॅप्टन कूलचं रौद्र रूप!

MS Dhoni Angry Moments: कॅप्टन कूलचा रौद्र अवतार तुम्ही कधी पाहिलाय का? खाण्याच्या मुद्द्यावरून धोनीने एकदा राहत असलेला हॉटेल सोडल्याचा किस्सा समोर आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महेंद्रसिंग धोनीना कॅप्टन कूल म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे त्याचा शांत आणि संयमी स्वभाव. चाहत्यांना त्याचा हा स्वभाव प्रचंड आवडतो. मात्र याच कॅप्टन कूलचा तुम्ही कधी रूद्र अवतार पहिलाय का? असाच धोनीच्या एका टीममेटने त्याच्या रागाबाबत खुलासा केला आहे. याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

धोनीच्या करियरमध्ये एक अशी देखील घटना घडलीये ज्यामध्ये तो चांगलाच संतापला होता. चेन्नई सुपर किंग्जमधील झोनीचा टीममेट असलेल्या ड्वेन स्मिथने त्याच्या एका इंटरव्यूमध्ये हा किस्सा सांगितला आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी एका हॉटेलच्या मॅनेजमेंटवर संतापला होता. धोनी त्यावेळी इतका रागात होता की त्याने हॉटेल देखील सोडलं होतं.

२ घटनांचा स्मिथकडून खुलासा

ड्वेन स्मिथने यावेळी अशा दोन घटनांबाबत खुलासा केला आहे, ज्यामध्ये धोनी चांगलाच संतापला होता. पहिल्या घटनेबाबत सांगताना स्मिथ म्हणाला की, अश्विनने एक कॅच सोडला होता, तो फारच सोपा कच होता. मात्र त्यानंतर धोनी चांगलाच वैतागला होता. यावेळी धोनीने अश्विनला स्पिपवरून हटवलं आणि दुसरीकडे फिल्डींगला ठेवलं. त्यावेळी पहिल्यांदा मी धोनीला इतक्या रागामध्ये पाहिलं.

हॉटेल स्फाफवर भडकला धोनी

ड्वेन स्मिथने हॉटेलमध्ये घडलेल्या एका गोष्टीचा उल्लेख केला. त्याने सांगितलं की, एकदा हॉटेल स्टाफने खाणं आतमध्ये आणण्यास रोखलं होतं. हे खाणं धोनीसाठी डिलीवर करण्यात आलं होतं. यावेळी देखील धोनी चांगलाच संतापला होता. यावेळी तो ते हॉटेल सोडून दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून गेला.

यंदाच्या आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करतोय धोनी

चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला. ऋतुराज टूर्नामेंटमधून बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला चेन्नईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. बऱ्याच वर्षानंतर धोनीच्या खांद्यावर ही जबाबदारी आली आहे. आता रविवारी चेन्नई विरूद्ध मुंबई सामना रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT