r ashwin breaks the record of anil kumble to took most five wickets haul for team india in test cricket  twitter
क्रीडा

R Ashwin Record: अश्विन अण्णा रॉक्स! १०० व्या कसोटीत मोडला अनिल कुंबळेंचा महारेकॉर्ड

India vs England 5th Test: या सामन्यातील दुसऱ्या डावात आर अश्विनने ११ षटकात ६४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले आहेत.

Ankush Dhavre

R Ashwin Breaks Anil Kumble Record:

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने धरमशाला कसोटीत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना धरमशालेतील HPCA स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात आर अश्विनने ११ षटकात ६४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले आहेत. या शानदार कामगिरीसह त्याने भारताचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. (R Ashwin Records)

आपला १०० वा सामना खेळत असलेल्या आर अश्विनने पहिल्या डावात ४ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात अश्विनने ५ गडी बाद केले आहेत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३६ व्या वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. तर अनिल कुंबळे यांनी हा कारनामा ३५ वेळेस करुन दाखवला आहे.

आर अश्विनने पाचव्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी हा कारनामा केला आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना बेन फोक्सला ८ धावांवर बाद करताच त्याने ५ गडी पूर्ण केल्या. भारतीय संघाकडून सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर ३५ वेळेस ५ गडी बाद करणारे अनिल कुंबळे या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. यासह २५ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा करणारा हरभजन सिंग या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर कपिल देव यांनी २३ वेळेस ५ गडी बाद केल्या होत्या. (Cricket news in marathi)

हे आहेत भारतीय संघासाठी सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज..

१) आर अश्विन- ३६ वेळेस

२) अनिल कुंबळे - ३५ वेळेस

३) हरभजन सिंग- २५ वेळेस

४)कपिल देव - २३ वेळेस

५) भागवत चंद्रशेखर - १६ वेळेस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

SCROLL FOR NEXT