puneri paltan vs telugu titans saam tv news
Sports

Pro Kabaddi News: तेलुगु टायटन्सला पुणेरी दणका! एकतर्फी विजयासह पलटण अव्वल स्थानी विराजमान

Puneri Paltan vs Telugu Titans: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने तेलुगु टायटन्स संघाचा ६०-२९ असा पराभव करून गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

Ankush Dhavre

Pro Kabaddi News In Marathi:

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने तेलुगु टायटन्स संघाचा ६०-२९ असा पराभव करून गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. पुणेरी पलटणच्या आकाश शिंदे(११ गुण), मोहंमद रेजा शादलुई (७ गुण), अबीनेश नदराजन(५ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

पाटली पुत्र इंडोर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत या लढतीत पुणेरी पलटण संघाने सुरेख सुरुवात करत ७ व्या मिनिटाला तेलुगु टायटन्सवर पहिला लोन चढवून ११-२ अशी आघाडी घेतली. पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदार, मोहित गोयत, आकाश यांनी आक्रमक खेळ करत १४ व्या मिनिटाला तेलगु संघावर दुसरा लोन चढवून संघाची आघाडी अधिक भक्कम केली. पिछाडीवर असलेल्या तेलगु संघाला पूर्वार्धात सुर गवसलाच नाही. पुणेरी पलटण संघाने पूर्वार्धात आपले वर्चस्व कायम राखत २९-६ अशी आघाडी मिळवली.

उत्तरार्धात पुणेरी पलटण संघाने आपला रंगतदार खेळ सुरूच ठेवत आपली आघाडी २५ गुणांच्या फरकाने वाढवली. तेलुगु टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावतला फारशी खेळी करता आली नाही. २८ व्या मिनिटाला पुणेरी पलटणच्या आकाशने सुपर रेड करत तेलगु संघाचे तीन गडी बाद केले व त्यामुळे तेलगु संघावर आणखी एक लोन चढवून संघाला ३२-७ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मोहंमद रेजा शादलुई, अबीनेश नदराजन यांनी आपला हाय फाय पुर्ण करत संघाला ४५-११ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. (Latest sports updates)

सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना तेलुगु संघाच्या संजीवने सुपर रेड करत ही काहीशी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण पुणेरी पलटण संघाने आपली आघाडी कायम ठेवत तेलगु संघावर ६०-२९ असा विजय मिळवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT