Pro Kabaddi News: गुजरात जायंट्सला पुणेरी दणका! रोमांचक सामन्यात पलटणचा ३४-२४ ने विजय

Gujarat Giants vs Puneri Paltan: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाची दमदार कामगिरी सुरुच आहे. या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
puneri paltan vs gujarat giants
puneri paltan vs gujarat giantssaam tv news
Published On

Gujarat Giants vs Puneri Paltan News :

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाची दमदार कामगिरी सुरुच आहे. या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पुणेरी पलटणने गुजरातला पुणेरी दणका देत ३४-२४ असा विजय मिळवला आहे. या सामन्यात ९ गुणांची कमाई करणारा मोहम्मदरेजा शादलू या विजयाचा हिरो ठरला आहे.

गच्चीबाऊली इंडोर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने सुरेख सुरुवात करत तीन गुणांची कमाई केली. सामन्यातील १० व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघ ९-४ असा आघाडीवर असताना मोहित गोयतने सुपर रेड करत संघाची आघाडी दोन गुणांनी वाढवली.

गुजरातकडून सोनू जगलानने सुपर रेड करत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्ध संपण्यास सहा मिनिटे शिल्लक असताना पुणेरी पलटणच्या मोहित गोयत, अस्लम इनामदार, पंकज मोहिते यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने गुजरातवर पहिला लोन चढवून आपली आघाडी १७-८ ने वाढवली. (Latest sports updates)

puneri paltan vs gujarat giants
IND vs ENG: टीम इंडियाचा हा स्टार फलंदाज ठरणार गेम चेंजर! रेकॉर्ड पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांचा थरकापच उडेल

उत्तरार्धात गुजरातच्या सोनूने केलेल्या सुपर रेडमुळे संघाला दोन गुण मिळवून दिले. पण मोहम्मदरेजा शादलूने एकदा सुरेख खेळ करत हाय ५ पुर्ण करत संघाची आघाडी २७-१६ अशी केली.

पुणेरी पलटण संघाने आपला डिफेन्स अधिक मजबूत करत अष्टपैलू खेळ केला. ३५ व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघ.३०-१८ असा आघाडीवर असताना गुजरातच्या सुपर टॅकल करत ही आघाडी काहीशी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण पुणेरी पलटण संघाने आपला बचाव अभेद्य ठेवत गुजरातला शेवटपर्यंत कमबॅक करण्याची संधी दिली नाही व हा सामना ३४-२४ असा जिंकून आपला या मौसमातील अकरावा विजय नोंदवला

puneri paltan vs gujarat giants
PKL Season 10: पवनला रोखण्यात बंगालला यश! वैभव - शुभमच्या डिफेन्सच्या बळावर बंगाल वॉरियर्सचा तेलगु टायटन्सवर विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com